आता बॉलीवूडमधील हे जोडपं लवकरच अडकणार विवाह बंधनात!!

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यामुळे स्टार्सच्या पॅच-अप आणि ब्रेकअपच्या बातम्या सोशल मीडियावर येताच सगळीकडे धुमाकूळ घालताना दिसतात. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत आहेत.

करणच्या कॉफी विथ करण(Koffee With Karan Show)च्या शोनंतर दोन्ही स्टार्सच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही २०२३ मध्ये लग्न करू शकतात. पण यादरम्यान, बॉलिवूड लाईफला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्याशी संबंधित एक खास माहिती मिळाली आहे.

हे समजल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नाच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळत आहेत. दोघे लग्नबेडीत कधी अडकणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान बॉलिवूड लाईफला मिळालेल्या माहितीमुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे.

सिद्धार्थ आणि कियारा लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू शकतात. ते दोघे एकत्र राहण्याचा विचार करत आहेत. बॉलिवूडचे बरेच कलाकार लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिले आहेत. हे वृत्त समजल्यावर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी लवकरच लग्न करतील, यावर चाहत्यांचा विश्वास बसला आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर यावर्षी एप्रिल महिन्यात लग्नबेडीत अडकले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते दोघेही लग्नाच्या आधी एकत्र राहत होते. एकत्र राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी विवाह बंधनात कधी अडकणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.