दीपिका पदुकोणने तिच्या मानसिक आरोग्याबद्दल केला खुलासा, म्हणाली – जर आई नसती तर….

दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या तब्येतीमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिलाही अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता तिची प्रकृती सुधारत असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चेन्नईत एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तीची प्रकृती खालावली. ती डिप्रेशनचीही शिकार झाली असून ती तिच्या मानसिक आरोग्याविषयी बोलताना दिसत आहे.

दीपिका पदुकोण तामिळनाडूतील तिरुवरुलूर येथे आहे. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. यानिमित्ताने तीचे मेंटल हेल्थ फाउंडेशन ‘लिव्ह लव्ह लाफ’ या कार्यक्रमाचा विस्तार केला आहे कारण दीपिका पदुकोण डिप्रेशनची शिकार झाली आहे. त्यामुळे ती वेळोवेळी लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याची जाणीव करून देते.

दीपिका पदुकोण तिच्या मुलाखतीत सांगते की जेव्हा मानसिक आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा अशा परिस्थितीत तुमच्याकडे काळजी घेणारी व्यक्ती असली पाहिजे आणि तिच्या आयुष्यातील ही व्यक्ती तिची आई आहे जिने तिची भूमिका चोख बजावली आहे.

ती म्हणते की माझ्या आईने माझ्या मानसिक आजाराशी संबंधित लक्षणे ओळखली नसती तर आज मी कुठे असते हे मला माहीत नाही. दीपिका पदुकोण म्हणते की, जेव्हा तुम्ही मानसिक आजारांशी झुंजत असाल तेव्हा त्यासाठी तुमच्या कुटुंबाची साथ असणे खूप गरजेचे आहे.

यावेळी कुटुंब खूप महत्त्वाची भूमिका बजावते आणि माझ्या आईने माझ्या मानसिक बाबी ओळखल्या आणि त्यांनी माझी खूप काळजी घेतली. आज मी ज्या ठिकाणी आहे त्या सर्व ठिकाणी माझ्या आईची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.