नेहा कक्करने करवाचौथ निमित्त अतिशय रोमँटिक फोटो केले शेअर..

बॉलीवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी करवा चौथचा सण साजरा केला आणि त्याची झलक त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली. लोकप्रिय गायिका आणि ‘इंडियन आयडॉल’ 13 ची जज, नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीत सिंगसाठी करवा चौथचा उपवास केला होता. नेहा कक्करने सोशल मीडियावर रोहनप्रीत सिंगसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत आहे.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पती रोहनप्रीत सिंगसोबत दिसत आहे. करवाचौथच्या निमित्ताने नेहा कक्कर अतिशय सुंदर दिसत होती. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनी एकत्र रोमँ’टिक पोज दिल्या. दोघांच्या क्युटनेसने चाहत्यांची तारांबळ उडाली होती.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगच्या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार कमेंट केल्या आहेत. नेहा कक्कर आणि रोहनप्रीतमध्ये खूप चांगले बॉन्डिंग आहे आणि याची उदाहरणे सोशल मीडियावर पाहायला मिळतात. करवा चौथच्या निमित्ताने या जोडप्याने एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. नेहा कक्करने पती रोहनप्रीत सिंगसाठी करवा चौथचा उपवास ठेवला होता,

तर रोहनप्रीत सिंगनेही पत्नी नेहा कक्करसाठी करवा चौथचा उपवास ठेवला होता. यावरून दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे दिसून येते. नेहा कक्करने 2020 मध्ये तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असलेल्या रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले. यानंतर दोघेही अनेकदा त्यांचे रोमँ’टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नेहा कक्कर सध्या ‘इंडियन आयडॉल 13’ला जज करत आहे.

यादरम्यान ती रोहनप्रीत सिंगला खूप मिस करत असल्याचे दिसून येते. यासाठी ती तिच्या पतीचा फोटो सोबत ठेवते. रोहनप्रीत सिंह ‘इंडियन आयडॉल 13’ च्या शेवटच्या एपिसोडमध्ये आला होता. यादरम्यान रोहनप्रीत सिंग आणि नेहा कक्कर यांनी स्टेजवर एकत्र गाणे गायले. यासोबतच दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published.