अनिल कपूरच्या घरी बॉलीवूड सुंदरींनी केली करवाचौथची पूजा, शिल्पा शेट्टी पासून ते रविना टंडन पर्यंत मोठमोठ्या अभिनेत्रींनी लावली हजेरी!

आज देशभरात करवा चौथ साजरी केली जात आहे. अनेक महिला त्यांच्या करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याच वेळी, ग्लॅमर वर्ल्ड देखील या उत्सवापासून लांब नाही. देशातील महिला सकाळपासून नवऱ्यासाठी उपवास करत असतानाच बॉलिवूड स्टार्सच्या बायकाही करवा चौथच्या पूजेसाठी सज्ज झाल्या आहेत.

शिल्पा शेट्टीपासून रवीना टंडनपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी अनिल कपूरच्या घरी भेट दिली जिथे सुनीता कपूरने करवा चौथ सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. लाल रंगाची साडी परिधान केलेली शिल्पा शेट्टी अतिशय सुंदर दिसत होती. हातात पूजेचे ताट घेऊन अभिनेत्री अनिल कपूरच्या घरी पोहोचली.

गळ्यात हिरव्या रंगाचा हिऱ्याचा हार आणि हातात बांगड्या घातलेली शिल्पा नवीन नवरीसारखी दिसत होती. शिल्पासोबतच इंडस्ट्रीत तिची चांगली मैत्रीण मानली जाणारी रवीना टंडन पूजा सेलिब्रेशनसाठी अनिल कपूरच्या घरी पोहोचली. भगव्या रंगाच्या साडीत रवीना टंडन खूपच मस्त स्टाईलमध्ये पोहोचली.

केसांना देसी स्टाईलमध्ये बन बांधून पांढऱ्या फुलांनी तिने केसांना सजविले होते. रवीनाचा हा लूक तिच्या ९० च्या दशकातील लूकची आठवण करून देणारा आहे. पारंपारिक लुक पूर्ण करण्यासाठी, रवीनाने तिच्या गळ्यात हेवी चोकर स्टाइल ज्वेलरी घातली होती.

वरुण धवनची पत्नी नताशा दलाल देखील या पूजा उत्सवाचा एक भाग होती. पिंक कलरच्या शरारामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. बहुरंगी पारंपारिक पोशाखात नीलम कोठारी देखील करवा चौथ पूजेसाठी अनिल कपूरच्या घरी पोहोचल्या. बहुतेक अभिनेत्री साडीत अनिल कपूरच्या घरी पोहोचल्या, तर भाऊ संजय कपूरची पत्नी महीप कपूर आउट-ऑफ-द-बॉक्स शरारामध्ये दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published.