रिचा चढ्ढा आणि अली फजलचा प्रायव्हेट फोटो आला समोर, कॅमेऱ्यासमोर झाले रोमँटिक….

बॉलीवूडचे नवीन जोडपे रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या प्री वेडिंग फंक्शनची तयारी सुरू झाली आहे आणि दोघेही त्यांच्या फंक्शनमध्ये खूप क्यूट दिसत आहेत आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अली फजल आणि ऋचा चढ्ढा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आता हे जोडपं अखेर ४ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकले आहे. अली फजल आणि रिचा चड्ढा यांच्या लग्नाचे फंक्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

हे लग्न दिल्लीत होणार असून, या दोघांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. ज्यामध्ये 29 सप्टेंबर रोजी मेहंदी सोहळा पार पडला. या खास प्रसंगी ऋचा चड्ढाने कृष्णा बजाज आणि राहुल मिश्राचे डिझायनर कपडे घातले होते, तर अली फजलने मेहंदी फंक्शनसाठी अबू जानी, संदीप खोसला आणि शंतनू निखिलचे कपडे परिधान केले होते.

अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी लग्नाआधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिचा चढ्ढा हिने चमकदार लेहेंगा आणि चोली घातली आहे, तर अली फजलने ऑफ-व्हाइट शेरवानी घातली आहे आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात मग्न झालेले दिसत आहेत.

या दोघांच्या लग्नाला हॉलिवूडचे सेलिब्रिटी जेरार्ड बटलर आणि जुडी डेंच देखील उपस्थित राहणार आहेत. लग्नाच्या कार्डांपासून ते सजावटीपर्यंत सर्व काही वेगळे आहे, जिथे एकीकडे लग्नपत्रिका मॅचबॉक्सेसद्वारे प्रेरित आहे, तर लग्नाच्या सजावटीचे संपूर्ण सामान पर्यावरणपूरक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.