अर्जुन कपूरने प्रियसी मलायकाचा नंबर या नावाने केला आहे सेव्ह, बेबी-डार्लिंग नाही तर चक्क….

अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांपेक्षा मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळे जास्त चर्चेत असतो. खरं तर, काही काळापूर्वी दोघेही एकमेकांबद्दल बोलायला लाजत असत, पण आता दोघेही एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. अर्जुन कपूर ‘कॉफी विथ करण 7’ च्या पुढच्या भागात दिसणार आहे. ज्याचा प्रोमोही रिलीज झाला आहे.

प्रोमोमध्ये अर्जुन कपूर स्वतः मस्ती करताना दिसत आहे. याशिवाय करिअरसोबतच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलला. यादरम्यान त्याने आपल्या प्रेयसीचा नंबर कोणत्या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह केला असल्याचेही सांगितले.

‘कॉफी विथ करण’मध्ये अर्जुन कपूर येतोय पण त्याचे चाहते आनंदी आणि दु:खीही आहेत. खरं तर, शोमध्ये आल्याने त्याच्याबद्दल अनेक अज्ञात गोष्टी उघड होतील याचा त्याला आनंद आहे, तर मलायका अरोरासोबत येत नसल्याचं दुःख आहे. वास्तविक तो शोमध्ये त्याची चुलत बहीण सोनम कपूरसोबत दिसणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान अर्जुन कपूरने त्याच्या लव्ह लाईफबद्दल कोणताही संकोच न करता मोकळेपणाने सांगितले. प्रोमोमध्ये करण जोहर अर्जुन कपूरला प्रश्न विचारताना दिसत आहे की त्याने मलायकाचा नंबर कोणत्या नावाने त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आहे? या मजेशीर प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, मलायकाचे नाव मला खूप आवडते.

म्हणून त्याने तिचा नंबर तिच्या नावावर सेव्ह केला आहे. 2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फो’ट झाल्यापासून मलायका अरोरा आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघेही लवकरच लग्न करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.