ललित मोदीसोबतच्या अफेअरनंतर आता सुष्मीता सेन पुन्हा एकदा जुन्या प्रियकरासोबत दिसली खाजगी सलेब्रशनमध्ये, नेटकऱ्यांना बसला धक्का!

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीसोबतच्या अफेअरमुळे खूप चर्चेत आहे. ललित मोदींनी काही काळापूर्वी सोशल मीडियावर सुष्मितासोबतचे नाते अधिकृत केले होते. मात्र, सुष्मिताने अद्याप ललितसोबतच्या नात्याची पुष्टी केलेली नाही. आता अलीकडेच माजी मिस युनिव्हर्सने तिच्या माजी प्रियकर रोहमन शॉल आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह तिच्या आईचा वाढदिवस साजरा केला.

सोमवारी इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान सुष्मिताने फॅमिली सेलिब्रेशनच्या काही झलक चाहत्यांसोबत शेअर केल्या. सुष्मिता तिच्या आईसोबत इंस्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधत असताना, रोहमन पार्श्वभूमीत सुष्मिताच्या मुलींसोबत बोलताना दिसला. ललितसोबतच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान सुष्मिताच्या कौटुंबिक सेलिब्रेशनमध्ये रोहमनचे अशा प्रकारे आगमन झाल्याने चाहत्यांमध्ये मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

काही दिवसांपूर्वी ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचे त्यांचे काही रोमँ”टिक फोटो ट्विटरवर शेअर केले होते दोघेही डेट करत असल्याचे लोकांना सांगितले. इतकेच नाही तर ललितने सुष्मिता सेनला बेटर हाफ सांगून लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पण नंतर सुष्मिता सेनने एका पोस्टद्वारे लग्नाची चर्चा नाकारली होती.

सुष्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉल 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही अनेकदा त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोमँ’टिक फोटो पोस्ट करताना दिसले. मात्र, 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रोहमन आणि सुष्मिताचे ब्रे’कअप झाले. अशा परिस्थितीत, सुष्मिताच्या फॅमिली फंक्शनमध्ये रोहमनच्या आगमनाने, सर्वांच्या नजरा आता दोघांकडे लागल्या आहेत आणि चाहत्यांचा अंदाज आहे की सुष्मिता आणि रोहमन यांचे पुन्हा एकदा पॅचअप झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.