अभिनेत्री पुन्हा झाली ट्रोल, रक्षाबंधनसाठी परिधान केला असा ड्रेस की..

टीव्ही अभिनेत्री निया शर्माने यापूर्वीच तिचे रक्षाबंधन साजरे केले आहे. खरंतर राखीच्या वेळी निया तिचा भाऊ विनयसोबत वेळ घालवते. तथापि, विनय व्यतिरिक्त, एक हजारों में मेरी बहना है मधून पहिला मोठा ब्रेक मिळवणारी ही अभिनेत्री शोचे निर्माते सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनाही आपला भाऊ मानते.

नेहमीप्रमाणे यंदाही नियाने रक्षाबंधनापूर्वी सिद्धार्थला राखी बांधली. तीने आपल्या छोट्याशा सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सेलिब्रेशनच्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला असला तरी काही सोशल मीडिया यूजर्सनी नियाने परिधान केलेल्या ड्रेसबद्दल तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. एका यूजरने लिहिले की, ‘कोणी या दिवशी असे कपडे घातले असते का.’

नियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये निया सिद्धार्थला राखी बांधताना दिसत आहे. यादरम्यान सिद्धार्थची पत्नी सपना मल्होत्राही त्याच्यासोबत दिसत आहे. या फोटोंसोबत नियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘लवकर किंवा उशीरा.. आमच्या राखी दुपारच्या जेवणाच्या विधी नेहमी अशाच राहिल्या पाहिजेत. माझा प्रिय भाऊ आणि वहिनी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सपना मल्होत्रा.’

Leave a Reply

Your email address will not be published.