अखेर ललित मोदीसोबतच्या संबंधांबद्दल सुष्मीता सेनने सोडले मौन, स्पष्टीकरण देत म्हणाली, मी अजून लग्न…

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. होय, ललित मोदींनी गुरुवारी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या नात्याची घोषणा केली तेव्हा सोशल मीडियावर खळबळ उडाली. एकीकडे ललित मोदींच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट करत होते. दुसरीकडे, यूजर्स सुष्मिताच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते.

त्याचवेळी ललित मोदींच्या पोस्टनंतर तब्बल 21 तासांनंतर सुष्मिता सेनने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने मुलींसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘मी आनंदी ठिकाणी आहे!!! ना विवाहित… ना अंगठी… बिनशर्त प्रेमाने वेढलेले!!” सुष्मिता सेनने पुढे लिहिले, “पुरेसे स्पष्टीकरण दिले… आता कामावर परतते!!

माझ्या आनंदाला नेहमी साथ दिल्याबद्दल धन्यवाद… आणि जे साथ देत नाहीत त्यांच्यासाठी… तरीही ‘तुम्हाला याच्याशी काही देणेघेणे नाही’!!! माझ तुमच्यावर प्रेम आहे मित्रानो!!!” गुरुवारी संध्याकाळी 7.44 वाजता ललित मोदींनी पहिले ट्विट केले आणि सुष्मिता सेनला आपला बेटर हाफ म्हटले. त्यानंतर दोघांचे लग्न झाल्याची चर्चा होती.

यानंतर 42 मिनिटांनी आणखी एका ट्विटमध्ये तो म्हणाला, “मला हे स्पष्ट करायचे आहे की अजून लग्न केले नाही, फक्त एकमेकांना डेट करत आहे. एक दिवस लग्न पण होईल.” याशिवाय ललित मोदींनी इन्स्टाग्रामवरील प्रोफाइल फोटोही बदलला आहे. नव्या फोटोमध्ये तो सुष्मिता सेनसोबत दिसत आहे.

इंस्टाग्राम बायोमध्ये ललित मोदींनी लिहिले आहे की त्यांनी सुष्मिता सेनसोबत नवीन आयुष्य सुरू केले आहे. सुष्मिता सेनला ललित मोदींनी क्राईममध्ये पार्टनर आणि ‘माय लव्ह’ असे संबोधले आहे. ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेनने रोहमन शॉलला अडीच वर्षे डेट केले होते. रोहमन आणि सुष्मिता यांच्या वयात १५ वर्षांचा फरक आहे.

सुष्मिता जिथे 46 वर्षांची आहे. त्याचवेळी रोहमन 30 वर्षांचा आहे. दोघेही बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. सुष्मिताच्या दोन मुली रेनी आणि अलिशासोबतही रोहमनचे चांगले संबंध आहेत. एवढेच नाही तर तो स्वत:ला दोघींचा वडील म्हणवून घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.