नम्रता शिरोडकरने बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम केले. तीने फार कमी चित्रपट केले, पण या चित्रपटांमध्ये तीला चांगलीच पसंती मिळाली. तिचे सौंदर्य असो की अभिनय, तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तीने बॉलिवूड स्टार सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी से होता है’, अनिल कपूरसोबत ‘पुकार’ आणि संजय दत्तसोबत ‘वास्तव’मध्ये काम केले.
तिने इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले, परंतु तीची कारकीर्द केवळ 6 वर्षे टिकली आणि तिने चित्रपटसृष्टीला अलविदा केला. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर नम्रता शिरोडकरचा जन्म 1972 मध्ये मुंबईतील एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंग केले आणि 1993 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला.
‘जब प्यार किसी से होता है’ (1998) या चित्रपटातून तीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तीच्यासोबत सलमान खान आणि ट्विंकल खन्ना देखील होते, तीला या चित्रपटात खूप पसंती मिळाली आणि चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
हिंदी व्यतिरिक्त ती साऊथचे चित्रपटही करत होती आणि त्याच काळात वामसी चित्रपटाच्या सेटवर महेश बाबू तिच्या प्रेमात पडले. 4 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी 10 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केले. महेश बाबू यांना अभिनेत्रीने चित्रपटात काम करावे असे त्यांना वाटत नव्हते. नम्रताने कुटुंबाची काळजी घ्यावी अशी त्यांची इच्छा होती.
नम्रताने चित्रपटांना अलविदा केला आणि आता ती गौतम आणि सितारा या दोन मुलांची आई आहे आणि तिच्या कुटुंबासोबत मजा करत आहे. ती इन्स्टावर तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते आणि लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नम्रताची बहीण अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आहे.
नम्रता शिरोडकरने ‘मिस इंडिया युनिव्हर्स’ तसेच ‘मिस इंडिया एशिया पॅसिफिक’चा किताब पटकावला. त्याचवेळी तीच्या ‘पुकार (2000)’ या चित्रपटाला उत्कृष्ट अभिनयासाठी ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार’साठी नामांकन मिळाले आहे.