करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले आहे. करिश्माने तिच्या करिअरमध्ये अनेक मोठे आणि हिट चित्रपट केले आहेत, करिश्मा सध्या चित्रपटांमध्ये फारशी दिसत नाही पण 90 च्या दशकातील बड्या अभिनेत्रींमध्ये ती एक नाव होती. करिश्माने तिच्या करिअरमध्ये आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्तसह अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.
करिश्मा कपूरच्या हिट चित्रपटांपैकी एक म्हणजे राजा हिंदुस्तानी चित्रपट, या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसली होती, या चित्रपटामुळे ती खूप चर्चेत आली होती. करिश्माने चित्रपटात आमिरसोबत असे काही सीन्स दिले होते, ज्यामुळे तो रातोरात चर्चेचा विषय बनला होता.
1996 मध्ये आलेल्या राजा हिंदुस्तानी चित्रपटात करिश्मा कपूर आणि आमिर खानने किसिंग सीन दिले होते. जे की खूप चर्चेचा विषय बनला होता. करिश्मा कपूरच्या किस सीनमुळे काही लोकांनी तिला खूप काही सांगितले होते. करिश्माने एका मुलाखतीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले होते.
तीने पहिल्यांदाच असा कोणताही चित्रपट केला होता ज्यामध्ये तीला असे सीन्स द्यावे लागले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तीने वडिलांना आणि कुटुंबीयांना याबद्दल काहीही सांगितले नव्हते. करिश्माने सांगितले होते की, करिश्माच्या म्हणण्यानुसार, अशा विचित्र परिस्थितीत इतका लांब किसिंग सीन शूट करणे तिच्यासाठी खूप कठीण होते.
एक किसिंग सीन शूट करण्यासाठी 3 दिवस लागले. करिश्माने सांगितले की, सकाळी सातच्या सुमारास थंड वातावरणात हा सीन शूट करण्यात आला होता. करिश्माने सांगितले होते की, त्या सीनचा सेट उटीमध्ये होता. मुसळधार पाऊस पडत होता, सोबत थंडावा ही होता. या सीनमुळे करिश्माला खूप नाराज व्हावं लागलं होतं.