डायबेटीज रुग्णासाठी गुळ योग्य की अयोग्य? घ्या जाणून..

डायबिटीज म्हणजेच मधुमेह एक मेटाबॉलिक विकार आहे. जे शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होते. शरीरातील साखरेची पातळी अनियमित वाढणे देखील तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जगभरात 400 दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतातही मधुमेही रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, रक्तातील साखरेच्या वाढत्या पातळीमुळे त्रासलेल्या प्रत्येकाला यातून सुटका हवी आहे.

मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो, अशा परिस्थितीत मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी गूळ खावा की नाही ते जाणून घेऊया-

गूळ पौष्टिक आहे: आरोग्य तज्ज्ञांच्या मते उसापासून साखर बनवण्याच्या प्रक्रियेत क्रिस्टलायझेशन झाल्यामुळे त्यातील सर्व गुणधर्म नष्ट होतात. त्याचबरोबर गुळ बनवताना त्यात आढळणारे पोषक तत्व नष्ट होत नाहीत. म्हणून, गुळात कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात. तथापि, ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.