पायासंबंधीत या समस्या खरतर आहेत मोठ्या आजारांचे निमंत्रण, दुर्लक्ष करू नका!!

पायांची काळजी घेण्याबाबत आपलं काम केवळ नखं कापण्यापुरतंच असतं. परंतु डॉक्टरांचं मत आहे की, शरीरात होणाऱ्या कोणत्याही गडबडीचा प्रभाव सर्वातआधी आपल्या पायांवर दिसतो. कारण आपले पाय हृदय आणि कण्यापासून सर्वात दूर असतात. त्यामुळे पायांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. पायांची त्वचा, नखांचा रंग किंवा आकार यावरून आपल्याला अनेक गंभीर आजारांचे संकेत मिळतात.

जर तुमच्या पायांवरील आणि अंगठ्यावरील केस अचानक गळू लागले असतील तर रक्तप्रवाहात समस्या असल्याचा संकेत मानला जातो. पुरेसा रक्त पुरवठा होत नसल्याने पायांवरील केस गळू लागतात. कारण त्यांना पोषण मिळत नाही. हा या गोष्टीचाही संकेत असू शकतो की, तुमचं हृदय रक्त पायापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसं पंप करत नाहीये.

जर तुमचा पाय नेहमीच लचकत असेल किंवा क्रॅम्प येत असेल तर तुमच्या शरीरात डीहायड्रेशन आणि पोषक तत्वांची कमतरता आहे. जर तुम्ही नियमितपणे एक्सरसाइज करत असाल तर जास्तीत जास्त पाणी प्यावे कारण अनेकदा क्रॅम्प डिहायड्रेशनमुळे येतात. तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे तुम्हाला योग्य प्रमाणात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम घेण्याचा सल्ला देतील. जर क्रॅम्प जास्त दिवस राहत असेल तर वेळीच योग्य ते उपचार घ्या.

बऱ्या न होणाऱ्या जखमा डायबिटीसचा संकेत देतात. रक्ता ग्लूकोजचं अनियंत्रण स्तर पायांच्या नसांना इजा पोहोचवतं. याचा अर्थ हा आहे की, जर जखमा, घाव किंवा पुरळ पायांवर असेल, जर यात इन्फेक्शन झालं तर स्थिती वाईट होऊ शकते. त्यामुळे पायांची काळजी नियमितपणे घ्या.

असं होत असेल तर हा hypothyroidism चा संकेत आहे. ज्यात तुमचे पाय गरम होत नाहीत. 40 वयानंतर ही समस्या अधिक बघायला मिळते आणि लोक याकडे वातावरणाचा प्रभाव म्हणून अनेकदा दुर्लक्ष करतात. hypothyroidism चे दुसरे नुकसानही आहेत जसे की, केसगळती, थकवा, अचानक वजन वाढणं, कॉन्स्टिपेशन आणि डिप्रेशन. यामुळेच पाय ठंड होण्याची समस्या समोर येताच वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.

यासोबतच अंगठा अचानक सूजला असेल किंवा लाल झाला असेल किंवा जॉइंटमध्ये वेदना हे आर्थरायटिसचे संकेत असू शकतात. जर तुमची टाच दुखत असेल तर याचा अर्थ होतो की, तुम्हाला शूज किंवा चप्पल बदलण्याची गरज आहे.

ही फंगल इन्फेक्शनची लक्षणं आहेत. यामुळे पाय जास्तीत जास्त कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. जर फंगल इन्फेक्शन नसेल तर हा एग्जिमाही असू शकतो. पण स्वत: कोणत्या निष्कर्षावर पोहोचण्याआधी डॉक्टरांना संपर्क करा.

Leave a Reply

Your email address will not be published.