एका अपत्यानंतर निक आणि प्रियंकाला हवी आहेत अजून 10 मुले, लोक म्हणाले एवढा वेळ…

देसी गर्ल प्रियांका चोप्राने अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप स्टार निक जोनासशी लग्न केल्यापासून ती शेवटी कधी आई होणार याची प्रत्येकाला प्रतीक्षा होती. अलीकडेच प्रियांका चोप्राने सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला आहे. निक आणि प्रियांका चोप्राने आपल्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस ठेवले आहे.

त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास अनेकदा त्यांच्या मुलीसोबत वेळ घालवतानाचे फोटो पोस्ट करतात. मुलगी मालतीच्या जन्मानंतर निक असे काही बोलुन गेला आहे की, जे ऐकून चाहते अस्वस्थ झाले, त्याचबरोबर चाहत्यांनी यावर प्रियांका चोप्राला प्रश्न विचारला आहे की, कामाच्या दरम्यान इतका वेळ कधी आणि कसा मिळणार?

एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत निक जोनासने सांगितले की, तो मुलासोबत खूप आनंदी आहे. प्रियांका चोप्राबद्दल बोलताना निक जोनास म्हणाला, “ती माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भागांपैकी एक आहे. मी कधी कल्पना केली होती तेच सर्व आहे. मला देवावर पूर्ण विश्वास आहे की आपण आयुष्यभर एकत्र राहू आणि आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू.

प्रियंका चोप्रा माझ्या जोडीदाराच्या भूमिकेत आहे याबद्दल मी भाग्यवान आहे. यादरम्यान निक जोनास म्हणाला की, मला एक-दोन नव्हे तर 11 मुले हवी आहेत. विशेष म्हणजे याआधी प्रियांका चोप्रानेही 11 मुलांबद्दल बोलले आहे. प्रियांका चोप्राने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिला तिच्या घरात एक संपूर्ण क्रिकेट टीम बनवायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.