केवळ फुलांनी झाकले अंग! नेटकरी म्हणले तेवढं तरी…

आपल्या अजब फॅशनमुळे कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणाऱ्या उर्फीला पुन्हा एकदा कपड्याचं वावडं असल्याचं पाहायला मिळालं. साखळदंड, शिंपले झाले आता उर्फीने चक्क फुलांची फॅशन केली आहे. उर्फीने फुलांनी अंग झाकलं आहे. तिच्या या फॅशनमुळे ती सोशल मीडियावर पुन्हा एकदा चांगलीच ट्रोल झाली आहे.

उर्फीने आपलं अगं फुलांनी झाकलं आहे. पिवळ्या रंगाच्या फुलांनी अंग झाकल्याचं ह्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिची ही हटके फॅशन सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुसती चर्चेत नाही तर सोशल मीडियाचाही पाराही वाढला आहे. उर्फी ही फॅशन करून बागेत फिरत असल्याचं दिसत आहे. तिच्या या स्टाईलवर चाहत्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

एका युजरने म्हटलं आहे उर्फीच्या धाडसाला सलाम. हिची क्रिएटिव्हिटी तर आकाशात पोहोचली आहे असं एका युजरने म्हटलं आहे. तर काही युजर्सनी तिला कपड्यांची कमतरता जाणवत असावी असं म्हणत ट्रोल केलं आहे. उर्फी नेहमीच आपल्या अजब फॅशनमुळे चर्चेत राहिली आहे. तिने काही दिवसांपूर्वी शिंपल्याने अंग झाकल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याआधी साखळीची फॅशन केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.