‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील हे कलाकार सोडणार मालिका!!

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग म्हणजे आयुष्यात असणारा सर्व त्रास विसरण्याची प्रत्येक वेळी मिळणारी संधी. कार्यक्रम सुरु झाला त्या क्षणापासून भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या आणि अशा बऱ्याच कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ ला घराघरात पोहोचवण्याचं काम केलं.

प्रत्येक कलाकारानं त्यांच्या परिनं या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत भर टाकली. काही कलाकार तर, चाहत्यांच्या कुटुंबाचाच भाग समजू लागले. अशा या सुरेख आणि हसऱ्या कुटुंबातून अर्थात ‘चला हवा येऊ द्या’मधून दोन आघाडीची नावं एक्झिट घेणार असल्याच्या बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

अभिनेता सागर कारंडे आणि भारत गणेपुरे हे दोघंही कार्यक्रमाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या. क्षणार्धातच आता कार्यक्रमाचं पुढे काय? असा चिंताजनक सूरही चाहत्यांनी आळवला.

हिंदी वाहिनीवरील एका कार्यक्रमासाठीच हे दोघंही कार्यक्रम सोडत असल्याचंही म्हटलं गेलं. पण, प्रत्यक्षातील चित्र मात्र वेगळं आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या दोघांनीही हिंदी कार्यक्रमाचा प्रस्ताव स्वीकारला असला तरीही ते ‘चला हवा येऊ द्या’ सोडणार नाहीयेत.

मुळात ते एकाच वेळी दोन्ही माध्यमांमधून झळकणार आहेत. आहे की नाही कमाल गोष्ट? त्यामुळे चिंता करु नका, तुमचा लाडका भारत आणि सागर दोघंही इथेच चिंतेला म्हणताहेत ‘डोक्याला शॉट नको हवा येऊ द्या.’

Leave a Reply

Your email address will not be published.