चक्क आता बॉलीवूड सेलेब्सकडूनच झाली ट्रोल, मालायकाची चालण्याची स्टाईल आता हसवतीये पूर्ण बॉलीवूडला…

मलायका अरोरा बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही, असे असूनही मलायका अरोरा नेहमीच खूप चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात राहते. आता मलायकाचे व्यक्तिमत्व असे आहे की कोणी काहीही केले तरी तिच्याबद्दल नेहमीच चर्चा असतेच. मलायका ही बॉलिवूडची स्टाईल दिवा आहे. मात्र, मलायका जितकी लोकांच्या हृदयात राहते तितकीच तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागते.

कधी तीच्या पाऊटिंग स्टाईलबद्दल तर कधी तिच्या चालीबद्दल. आता मलायका पुन्हा एकदा तिच्या चालीमुळे ट्रोल होत आहे. बरं, ही पहिलीच वेळ नसून मलाइकाला तिच्या या चालीवरून अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्याखाली अली आहे. आणि आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेटकाऱ्यांद्वारे सोशल मीडियावरच नव्हे तर तीच्या सहकलाकारांनी देखील तीच्या या चाली आणि पाणी पिण्याच्या स्टाइलची तीच्यासमोर खिल्ली उडवली आहे.

फार पूर्वी, जेव्हा मलायका द कपिल शर्मा शोमध्ये इंडिया बेस्ट डान्सरच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती, तेव्हा इथेही असेच दृश्य पाहायला मिळाले होते. कोरिओग्राफर गीता कपूरपासून ते भारती सिंगपर्यंत सर्वांनी मलायकाच्या मूव्ह आणि तिच्या जिम लूकची खिल्ली उडवली. तथापि, मलायका देखील एक विनोद म्हणून घेते आणि सोशल मीडियावर लोक तिच्याबद्दल काय बोलतात याची ती फारशी पर्वा करत नाही.

आणि ती कालांतराने ट्रोलिंगला सामोरे जाण्यास शिकली आहे. तसे, मलायका अरोराला ट्रोल करणार्‍यांपेक्षा तिच्या स्टाइलवर मरणारे आणि तिच्या स्टाइलचे वेडे असणारे लोक जास्त आहेत. यामुळेच मलायकाची लोकप्रियता बॉलिवूडच्या कोणत्याही टॉप अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.