विमानतळावर स्पॉट झाले अनुष्का आणि विराट, चाहत्यांनी विचारले मुलीला कुठे सोडले…!

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहे. दोघे नेहमीच चाहत्यांसाठी कपल गोल सेट करताना दिसतात. अनुष्का-विराटला जेव्हाही चाहते एकत्र पाहतात तेव्हा ते खूश होतात. दोघांचे फोटो सतत व्हायरल होत आहेत. आज अनुष्का आणि विराट मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. दोघांचे विमानतळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनुष्का आणि विराट दोघांनीही विमानतळावर फोटोग्राफर्सना पोज दिली. दोघांचा एअरपोर्ट लूक चाहत्यांची मने जिंकत आहे. अनुष्का शर्माने डेनिम शॉर्ट्ससह हिरवा शर्ट कॅरी केला होता. पांढऱ्या शूजसह तिने हा लूक पूर्ण केला. या सिंपल लूकमध्ये अनुष्का खूपच क्यूट दिसत आहे. दुसरीकडे, विराट कोहलीच्या लूकबद्दल बोलायचे तर, त्याने पांढऱ्या ट्राउझर्ससह बेबी पिंक कलरचा टी-शर्ट घातला होता. विराट या लूकमध्ये नेहमीप्रमाणेच कूल दिसत आहे.

विराट आणि अनुष्काने फोटोग्राफर्सना हसत हसत पोजही दिली. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे ती बऱ्याच काळानंतर अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे. अनुष्काच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अनुष्का भारतीय महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.