ढसा ढसा रडली अभिनेत्री दीपिका पदुकोण, व्हिडिओ आला समोर…

17 मे पासून सुरू झालेला चित्रपट जगतातील सर्वात मोठा महोत्सव ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022’ 29 मे रोजी संपला आणि तारे आपापल्या घरी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय अभिषेक आणि आराध्यासोबत मुंबई विमानतळावर दिसली होती. त्याचबरोबर दीपिका पदुकोणही मुंबईत परतली आहे. विमानतळावरून बाहेर पडताना दीपिकाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात अभिनेत्री हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे.

कान्सच्या शेवटच्या दिवशी दीपिका खूपच भावूक दिसत होती. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर कान्सच्या शेवटच्या दिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री ढसाढसा रडताना दिसत आहे. इतकंच नाही तर दीपिकाची टीमही रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दीपिका म्हणते की, ‘आम्ही येथून जात आहोत आणि सगळे खूप नाराज आहेत’. यानंतर दीपिका आणि तिची टीम रडताना दिसत आहे.

मात्र, दीपिका भावूक होण्यात एक ट्विस्ट आला आहे. खरं तर, दीपिका खरंच खूप रडत नाही, पण तिने या व्हिडिओसाठी रडणारा फिल्टर वापरला आहे, जो आजकाल इन्स्टाग्राम रील्समध्ये खूप वापरला जात आहे. हा फिल्टर पाहून खुद्द दीपिकालाही हसू आवरत नाही. व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणतेय, ‘पहिल्यांदा मला वाटलं की ही व्यक्ती रडत आहे… पण नंतर मला ओह्ह, ये तो फिल्टर है अस लक्षात आलं.
https://www.instagram.com/reel/CeJQLrOAPsP/?utm_source=ig_web_copy_link

फिल्टर पाहून दीपिका हसायला लागली. दीपिकाचा हा लूक पाहून पती रणवीर सिंगलाही हसू आवरता आले नाही. दीपिका कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून दिसली होती. दीपिकाने तिच्या आउटफिट्स आणि लूकमुळे संपूर्ण महोत्सवावर वर्चस्व गाजवले.

Leave a Reply

Your email address will not be published.