लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने बॉबी देओलने पत्नी सोबत अतिशय रोमँ’टिक पोज देऊन फोटो केले शेअर, पहा…

बॉबी देओल आणि त्याची पत्नी तानिया देओल यांनी सोमवारी म्हणजेच आज त्यांच्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला. या जोडप्याने 1996 मध्ये लग्न केले आणि 2001 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, आर्यमन देओलचे स्वागत केले. तर त्यांचा मुलगा धरम देओलचा जन्म 2004 मध्ये झाला. लग्नाला 26 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बॉबीने इंस्टाग्रामवर तानियासोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे.

या छायाचित्रात बॉबी आणि तानिया एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. बॉबी हिरव्या रंगाच्या कॅज्युअल टी-शर्टमध्ये दिसत आहे, तर तानियाने फुलांचा पोशाख घातला आहे. बॉबी तीच्या गालाचे चुं’बन घेण्यासाठी खाली वाकल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना बॉबीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माय लाईफलाइन’ यासोबत त्याने हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.

पोस्टवरील कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावर अभिनेता चंकी पांडेने लिहिले की, “हॅप्पी हॅप्पी अॅनिव्हर्सरी डिअर तानिया आणि बॉबी” हुमा कुरेशी, चंदन रॉय सन्याल, अध्यायन सुमन आणि सीमा खान यांनीही या पोस्टवर कमेंट केली आहे. एका चाहत्याने फोटोवर ‘सुंदर’ अशी कमेंट केली आहे.

तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘काय कपल’. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही दोघे खूप रोमँ’टिक दिसत आहात.” बॉबी देओल हा अभिनेता धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा मुलगा आहे. त्याने 1995 मध्ये बरसात या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर तो गुप्त, सैनिक, बादल, बिछू, आणि प्यार हो गया, अजनबी आणि हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला.

तो शेवटचा २०२२ मध्ये सान्या मल्होत्रा आणि विक्रांत मॅसीसोबत लव्ह हॉस्टेल या चित्रपटात दिसला होता. सध्या तो चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या आश्रम या हिट मालिकेच्या तिसऱ्या सीझनची तयारी करत आहे. हे MX Player वर 3 जून रोजी रिलीज होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.