दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आज चित्रपट सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा झाला आहे. चित्रपट ‘धडक’ पासून बॉलीवुड मध्ये पदार्पण करणारी जान्हवी हिने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. अभिनयासोबतच जान्हवी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील खूप सक्रिय असते.
जान्हवी कपूर नेहमी आपले हॉट आणि बोल्ड फोटोज व व्हिडिओज शेयर करून चाहत्यांमध्ये चर्चा तयार करते. याच दरम्यान जान्हवीचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती अनोळखी व्यक्तीचा हात पडकुन मीडिया समोर स्पॉट झाली आहे. या दरम्यान तिचा हॉट लूक देखील चर्चेत आला आहे.
https://www.instagram.com/p/Cdz-9oqPNQC/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यावर टिप्पणी करून आता जान्हवीला चाहते या अनोळखी व्यक्तीबद्दल विचारत आहेत. या व्हिडीओला टिप्पणी देत एकाने विचारते की, ‘हा मुलगा कोण आहे?’ तर एकाने विचारले, ‘हा काय जान्हवीचा प्रियकर आहे?’ तर कोणी म्हणे, ‘हातात हात म्हणजे हा प्रियकरच आहे.’