अखेर हृतिकने आपले नाते केले अधिकृत, 12 वर्षाने लहान नवीन प्रियसीसोबत पोहचला पार्टीमध्ये…

चित्रपट निर्माता करण जोहरने 25 मे रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला आणि त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. करण जोहरने 50 व्या वाढदिवसानिमित्त एक ग्रँड पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध बॉलीवूड तारे आणि मोठे सेलिब्रिटी पोहोचले होते. पण या बर्थडे पार्टीत ज्या जोडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ती म्हणजे हृतिक रोशन आणि सबा आझादची जोडी.

हृतिक आणि सबा आझादचे एकत्र अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण हृतिक रोशन आणि सबा आझाद हे पहिल्यांदाच अधिकृतपणे सर्वांसमोर दिसले. अशा प्रकारे हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनी त्यांचे नाते सार्वजनिकरित्या अधिकृत केले आहे. करण जोहरच्या पार्टीत हृतिक आणि सबा काळ्या रंगाच्या पोशाखात पोहोचले आणि दोघेही खूपच सुंदर दिसत होते. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनी कॅमेऱ्यासमोर अतिशय आनंदात पोज दिली.

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांना डेट करत असल्याच्या बातम्या या वर्षी जानेवारीमध्ये जेव्हा दोघे एकत्र स्पॉट झाले होते तेव्हापासून सुरू झाले होते. मात्र, त्यानंतर किंवा नंतर हृतिक किंवा सबा यांनी काहीही सांगितले नाही. यानंतर दोन्ही लव्ह बर्ड्स अनेकदा एकत्र दिसले आहेत. काही आठवड्यांपूर्वी, सबा आझाद देखील हृतिक रोशनच्या घरी डिनरसाठी गेली होती आणि कुटुंबासोबत फोटोज दिले होते.

हृतिक रोशनने काही वर्षांपूर्वी पत्नी सुझान खानपासून घटस्फो’ट घेतला होता. दोघांचे 2000 साली लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत. 2014 मध्ये हृतिक आणि सुझैनचा घटस्फो’ट झाला. हृतिक आता सबा आझादला डे’ट करत आहे, तर सुजैन खान अर्सलान गोनीला डे’ट करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.