वयाच्या 43व्या वर्षी राखी सावंतने पुन्हा केली लग्नाची तयारी, एंगेजमेंट करून आता….

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत प्रसिद्धीच्या झोतात राहणे चांगलेच जाणते. सध्या ती तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीमुळे चर्चेत आहे. आता अभिनेत्रीने आदिलसोबत एंगेजमेंट केल्याची चर्चा आहे. सर्वप्रथम, राखी सावंत फेब्रुवारी 2022 मध्ये पती रितेशपासून विभक्त झाली होती. काही दिवसांपूर्वी तीने चाहत्यांना सांगितले होते की ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. अभिनेत्री आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे, जो की एक कार डीलर आहे. आता दोघांची एंगेजमेंट झाल्याची चर्चा आहे.

आता सगळीकडे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी सावंत तिची एंगेजमेंट रिंग दाखवते. राखीने देवाचे आभार मानत व्हिडिओची सुरुवात केली. हा पब्लिसिटी स्टंट नसल्याचे ती म्हणते. यासोबतच तीने आपली मोठी हिऱ्याची अंगठीही दाखवली आणि आदिलला तीच्या आयुष्यातील प्रेम म्हटले. राखी काळ्या रंगाच्या चमकदार गाऊनमध्ये तिची अंगठी दाखवताना खूपच सुंदर दिसत होती.

याशिवाय राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती विमानतळावर आदिलसोबत दिसत आहे. जेव्हा पापाराझीने तिला विचारले, ती कुठे चालली आहे? तर यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने सांगितले की ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत दुबईला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.