मराठमोळी प्रसिध्द अभिनेत्री हृता दुर्गुळेने अखेर बांधली लग्नगाठ, अतिशय थाटामाटात केले…

‘फुलपाखरू’ फेम, मराठी मालिका विश्वात अतिशय गाजलेली आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बंधनात अडकली आहे. हृताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नागाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो समोर आले आहे. हे फोटोज सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. सोशल मीडियावरून हृता आणि प्रतीक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

‘मराठी सीरियल्स ऑफिशियल’ या इन्स्टाग्राम पेजवरून हृता आणि प्रतीक यांच्या लग्नातील फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये हिंदी टीव्ही जगतातील बरेच कलाकार दिसत असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हृताच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान हृता आणि प्रतीक शाह यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून देखील लग्नाबाबत पोस्ट किंवा फोटो शेअर केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हिंदी टीव्ही जगतातील कलाकारांसोबत हे दोघंही पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये हृताच्या कपाळावर कुंकू, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसुत्र दिसत आहे. हृता दुर्गुळेनं काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंड प्रतीक शहाची ओळख करून दिली होती. प्रतीक हा हिंदी टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा २५ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. त्यानंतर हे दोघं लग्न कधी करणार याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. दिग्दर्शक प्रतीक शाह याच्याशी तिनं लग्नगाठ बांधली. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हृतानं प्रतीकशी लग्नगाठ बांधली आणि सोशल मीडियावरून तिच्यावर शुभेच्छांची बरसात झाली.

तिच्या फोटोंवर चाहते कमेंट करत नाही, तोच आणखी एका अकाऊंटवरून तिच्या लग्नातील व्हिडीओ समोर आला. जो सर्वांनाच भावूक करुन गेला. हृताच्या लग्नाच तिच्या मेकअपची आणि हेअरस्टायलिंगची जबाबदारी असणाऱ्या निशी गोडबोले आणि त्यांच्या टीमनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये हृता लग्नमंडपात येताना दिसत आहे. प्रत्येक नववधूच्या मनात असणारे भाव यावेळी तिच्याही मनात घर करुन गेले होते.

हृताच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. चेहऱ्यावर हसू होतं, पण मनातून मात्र तिला गहिवरून आलं होतं. लाडक्या लेकिला लहानाची मोठी केली पण, आता काही क्षणांनीच तिची पाठवणी करायची या भावनेनं हृताच्या आई- बाबांनाही भावना आवरता आल्या नाहीत.

काहीही न बोलतासवरताही हा व्हिडीओ त्याच्या भावनांवाटे बरंच काही बोलून गेला हेच इथं पाहायला मिळत आहे. हृताचा व्हिडीओ पाहताना, माहेर सोडून सासरी गेलेल्या अनेक सासरवाशिणींनाही क्षणार्धात त्यांची माय आठवेल असं म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.