करिश्मा कपूरची 17 वर्षांची मुलगी आईला देतीये टक्कर, लवकरच करू शकते बॉलीवूडमध्ये पदार्पण…

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट आहेत. आज जरी ही अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी चाहत्यांमध्ये लाइमलाइटमध्ये कसे राहायचे हे तिला माहीत आहे. ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मग ते संजय कपूरपासून घटस्फो’ट घेणे असो किंवा दोन्ही तिच्या मुलांना एकटीने सांभाळणे असो. अभिनेत्रीची मुले आता मोठी झाली आहेत.

अशा परिस्थितीत करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूरदेखील आता लाइमलाइटमध्ये येत आहे. तिचे बरेच फोटोज समोर येताच जोरदार व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये समायरा खूप बदलली आहे असे दिसून येते. दिवसेंदिवस समायरा तिच्या आईसारखी स्टायलिश आणि सुंदर होत आहे. मिरर सेल्फी घेताना समायरा कपूर खूपच वेगळ्या अंदाजात दिसत आहे. तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

समायर तिची मावशी आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला सौंदर्यात जबरदस्त स्पर्धा देत आहे. समायरा कपूरने तिचा 16 वा वाढदिवस तिच्या आईसोबत मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला होता. त्याचे फोटोज देखील चांगलेच व्हायरल झाले होते. फोटोमध्ये समायरा खूप आनंदी दिसत आहे. समायरा कपूर नेहमीच तिच्या आईच्या खूप जवळ राहिली आहे. तसेच ती तिच्या मावशीची दवखील खूप लाडकी आहे.

समायरा कपूर इतर स्टार किड्सप्रमाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. आगामी काळात करिश्मा कपूरची मुलगी लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश करू शकते. तीच्या पदार्पणासाठी चाहतेही आतुर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.