बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने दवखील मोठ्या थाटामाटात साजरा केला गुढीपाडवा, नववारी साडीमधील अतिशय सुंदर फोटोज शेअर करून…

दिनांक 2 एप्रिल रोजी राज्यभरात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गुढी उभारुन नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. मराठी कलाकारांसह बॉलिवूड कलाकारांनीदेखील नववर्षाचं पारंपारिक पद्धतीत स्वागत केलं आहे. हा गुढी पाडवा बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीत साजरा केला आहे.

श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीत गुढी पाडवा साजरा केला आहे. तसेच तिने चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. श्रद्धा कपूरने नऊवारी साडी नेसलेले, गुढीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रद्धाचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

श्रद्धा कपूरने फोटो शेअर करत लिहिले आहे,”नव्या संकल्पांनी करुया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”. श्रद्धाच्या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत तिलादेखील गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. गुढीपाडव्याचा सण श्रद्धा कपूरसाठी खास आहे. कारण तिची आई महाराष्ट्रीयन आहे.

श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर पंजाबी आहेत, तर तिची आई शिवांगी महाराष्ट्रीयन आहे आणि त्यामुळेच ती सर्व महाराष्ट्रीयन सण साजरे करत मोठी झाली आहे. श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पिवळ्या आणि निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केलेली दिसत आहे. नऊवारी साडीसोबत, श्रध्दा सोन्याचे दागिने आणि मॅचिंग बांगड्या घालते आणि ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये खूपच गोंडस दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.