मलायका आरोराच्या कारचा झाला भीषण अपघात, मुंबईतील अपोलो रुग्णालयात…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा अपघात झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईला लागून असलेल्या पनवेल परिसरात अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला, त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात नेले. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात गाडी चालवताना मलायकाच्या चालकाचा तोल गेला आणि त्याची कार मनसे कार्यकर्त्यांच्या तीन वाहनांना धडकली.

या अपघातात अभिनेत्रीच्या डोळ्याला दुखापत झाली असून, तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक वृत्त संकेतस्थळाला याबाबत माहिती दिली. मनसेचे पदाधिकारी जयराम लंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी सर्व कार्यकर्ते पुण्याहून मुंबईला जात होते. यादरम्यान मलायकाच्या कारचा पनवेलजवळ तोल गेल्याने तिची कार पदाधिकाऱ्यांच्या तीन वाहनांना धडकली.

अभिनेत्री मलायका अरोरा शनिवारी दुपारी एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान तीने त्याचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मलायका ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आहे. छैय्या छैया, माही वे, मुन्नी बदनाम इत्यादीसारख्या तिच्या काही प्रसिद्ध नृत्य गाण्यांसाठी ही अभिनेत्री ओळखली जाते. याशिवाय अभिनेत्री इंडियाज गॉट टॅलेंट, इंडिया बेस्ट डान्सर, झलक दिखलाजा यांसारख्या टॅलेंट शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे.

याशिवाय अभिनेत्री सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्रीने यापूर्वी बॉलिवूड अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले होते. या लग्नातून दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे, पण मलायका आणि अरबाज यांचा 2017 मध्ये घटस्फो’ट झाला, त्यानंतर अभिनेत्री अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.