बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रद्धा कपूरचे सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत ब्रे’कअप झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दोघेही ४ वर्षे एकत्र होते. पण आता ते वेगळे झाल्याच्या बातम्या येत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गोव्यात श्रद्धा कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रोहनने हजेरी लावली नसल्याची चर्चा आहे.
त्या दिवशी तो अतिशय मोकळा आणि आनंदी वावरताना दिसला. अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, या जोडप्याचे नाते जानेवारीपासूनच बिघडत होते. त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. असंही बोललं जात आहे की, श्रद्धा कपूरच्या कुटुंबाला रोहन खूप आवडतो. श्रद्धा कपूर आणि रोहन हे बालपणीचे मित्र आहेत, त्यांच्या कुटुंबातही एकमेकांशी चांगले नाते आहे.
श्रद्धा आणि रोहन गेल्या 4 वर्षांपासून डेट करत होते. जरी त्यांनी कधीही त्यांचे नाते अधिकृत केले नाही. दोघे अनेकदा डिनर डेटवर एकत्र दिसले. इंटरनेटवर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र आता शहनाईचा आवाज येण्याआधीच दोघे वेगळे झाले आहेत. ब्रे’कअपच्या बातमीवर दोघांपैकी कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही.
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लव रंजनच्या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. श्रद्धा नागिन ट्रायलॉजीमध्येही काम करणार आहे. श्रद्धा पंकज पाराशर यांच्या ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटातही दिसणार आहे. ही अभिनेत्री शेवटची बागी 3 या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसली होती.