अरुंधतीने पुन्हा एकदा केली सर्वांची बोलती बंद! आई कुठे काय करते मालिकेत होणार ही धम्माल…

अरुंधतीची आई कुठे काय करते ही मालिका सध्या घराघरात खूपच लोकप्रिय झाली आहे. यातील संपूर्ण कलाकारांना खूप प्रसिद्धी देखील मिळत आहे. मालिकेच्या कथानकात सातत्यानं वेगवेगळी पण तितकीच मनोरंजनक वळणं येत आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसागणिक अत्यंत रंजक होत चालली आहे. नुकताच मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे.

त्यामध्ये अरुंधती आणि आशुतोषचा नवीन अल्बम रिलीज होणार आहे. त्या अल्बमची घोषणा करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते. त्यामध्ये अरुंधतीचा स्पष्टवक्तेपणा पुन्हा एकदा सर्वांच्या समोर येणार आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये आशुतोष आणि अरुंधती नवीन अल्बमची घोषणा करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेताना दिसत आहेत.

यावेळी त्यांच्या अल्बमच्या रिलीजची ते तारीख जाहीर करणार आहेत. या पत्रकार परिषदेला आशुतोष, अरुंधती आणि संजनाही उपस्थित आहेतच. शिवाय अनिरुद्ध देखील एका कोपऱ्यात खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. यावेळी एक पत्रकार अरुंधतीला प्रश्न विचारतो की, अनेक नवनवीन गायक येत आहेत, असं असताना तुम्हाला एवढी मोठी संधी देण्यामागचं कारण काय?

त्यावर अरुंधती स्पष्टपणे उत्तर देते आणि सांगते की, ‘गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न उपस्थित होत आहे. पण आज जाहीरपणे याचं उत्तर देते. केवळ मैत्री म्हणून आशुतोष यांनी मला ही संधी दिली असती तर इतक्या लोकांना माझं गाणं आवडलं नसतं. माझ्या वाट्याला जे आलं त्याला मी १०० टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे…’

अरुंधतीचं हे स्पष्ट उत्तर ऐकून सर्व जण थक्क होतात आणि तिचं भरभरून कौतुक करतात. दरम्यान या मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहून मालिकेत पुढे नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिकेवर चाहते नेहमीच भरभरून प्रेम करताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published.