21 वर्षाची शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना दिसतोय जणू राजकन्या, फोटोज समोर येताच होत आहेत वेगाने व्हायरल…

शाहरुख खान आणि गौरी खानची लाडकी सुहाना खान तिच्या ग्लॅ’मरस स्टा’ईलमुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. मात्र, यावेळी ती देसी अवतारात दिसली, ज्यामध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. देसी लूकमधील सुहाना खानचे हे फोटो प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला असून तिच्या देसी स्टाइलचे कौतुकही केले जात आहे. सुहाना खान लवकरच तिच्या अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकते तर तिचा भाऊ आर्यन खान वेब सीरिजद्वारे लेखक म्हणून करिअर सुरू करू शकतो.

मनीष मल्होत्राने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून सुहाना खानचे काही सुंदर लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुहाना मनीष मल्होत्राच्या डिझायनर लेहेंग्यात दिसत आहे. सुहाना खानने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी लेहेंगा घातला आहे, त्यात पांढऱ्या दगडाच्या कानातले आहेत. या देसी अवतारातील सुहानाचा लूक एकदम अप्रतिम दिसत आहे. चाहत्यांनाही सुहानाचा हा जबरदस्त ट्रेडिशनल लूक आवडला आहे. याआधीही सुहाना मनीष मल्होत्राच्या डिझायनर ड्रेसमध्ये दिसली आहे.

नुकताच मनीष मल्होत्राने लाल डिझायनर साडीतील सुहानाचा फोटो पोस्ट केला, जो खूप व्हायरल झाला. सुहाना खान आत्तापर्यंत कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही, असे असूनही सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. मनीष मल्होत्राच्या या पोस्टवर कमेंट करत सुहानाचे चाहते तिची जोरदार प्रशंसा करत आहेत.

एका चाहत्याने लिहिले, ‘आजच्या स्टार किड्समध्ये सुहानाचे व्यक्तिमत्त्व सर्वोत्कृष्ट आहे’. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले की, ‘राजकन्यासारखी सुंदर’. नुकतेच सुहाना खान तिचा भाऊ आर्यन खानसोबत आयपीएल लिलावमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. यादरम्यान सुहानाने शाहरुख खानची टीम कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळाडूंसाठी बोली लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.