बॉलीवूडच्या या बो’ल्ड अप्सरा जेव्हा एकत्र पार्टीत झाल्या स्पॉट, चढले इंटरनेटचे तापमान …

सध्या सोशल मीडियापासून ते बॉलिवूडच्या चाहत्यांपर्यंत फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर सर्वत्र झळकत आहेत. दोघांचे नुकतेच लग्न झाले. गुरुवारी, काल रात्री निर्माते रितेश सिधवानी यांनी या नवविवाहित जोडप्यासाठी ग्रँड पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडच्या सौंदर्यवतींमध्ये बो’ल्डनेस आणि सौंदर्याची स्पर्धा लागली होती. या पार्टीत करीना कपूर खान, मलायका अरोरा, दीपिका पदुकोण असे अनेक सेलिब्रिटी वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसले.

आता या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध गर्ल गँगदेखील पोहचली होती, त्यांची मैत्री वर्षानुवर्षे अबाधित आहे. या गँगमध्ये करीना कपूर खान, करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा आहेत. या हायप्रोफाईल पार्टीतही ही गर्ल गॅंग एकत्र पोहोचली. चौघेही सौंदर्यात एकमेकांना जोरदार टक्कर देताना दिसले. दीपिका पदुकोण पुन्हा सर्वांच्या नजरेत आहे.

या पार्टीत दीपिकाने काळ्या रंगाचा टाइट डिझायनर आउटफिट परिधान केला होता. पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटींमध्ये दीपिकाची स्टाइल सगळ्यात खास असल्याचे पाहायला मिळत आहे. शिबानी दांडेकरची बहीण अनुषा दांडेकर बो’ल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या बहिणीच्या पार्टीत ही हसीना हायस्लिट गाऊनमध्ये पोहोचली होती. तिचे कुरळे केस आणि परफेक्ट फिगर लोकांना थक्क करते.

आर्यन खान आणि सुहाना खानही या पार्टीत पोहोचले. दोघांची स्टाइल खूपच खास दिसत होती. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा हे स्टार किड्स देखील एवढ्या मोठ्या कलाकारांच्या पार्टीत दिसत आहेत. त्यांच्यासोबत फराह खान आणि गौरी खानही दिसल्या होत्या. व्हिडिओ आणि फोटो पाहून या पार्टीची थीम काळी असल्याचे दिसत आहे. पण रिया चक्रवर्ती वेगळ्या ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published.