अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल यांचे लग्न झाले. अनमोलने क्रिशा शहासोबत सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नाचे काही फोटो आता इंटरनेटवर आले आहेत, ज्यावर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोंमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. अनमोल आणि क्रिशाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनमोल अंबानी गेल्या अनेक दिवसांपासून क्रिशासोबतच्या लग्नामुळे चर्चेत होते. कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंनी या जोडप्याच्या लग्नाला पुष्टी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिझनेसमन अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल क्रिशा याला बऱ्याच दिवसांपासून डे’ट करत होता. अनमोलने त्याच्या लग्नात हलक्या राखाडी रंगाच्या शेरवानी परिधान केली होती. त्यामध्ये तो अगदी राजकुमार सारखा दिसत होता, तर क्रिशा लाल रंगाच्या हेवी सिल्व्हर जरदोजी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. क्रिशाचे फोटो पाहिल्यानंतर अनेक जण तिला यंग टीना अंबानी म्हणू लागले.
अनमोल आणि क्रिशाच्या लग्नाला अनेक प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सनीही हजेरी लावली होती. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तुम्ही श्वेता नंदा, तिची मुलगी नव्या नवेली नंदा, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना पाहू शकता. या फोटोत सोनम कपूरचा पती आनंद आहुजाही दिसला. दुसरीकडे, टीना अंबानी तिच्या मुलाच्या लग्नात लाल आणि हिरव्या रंगाच्या भारी भरतकाम केलेल्या लेहेंग्यात दिसली.
अनमोल अंबानीच्या लग्नाच्या फोटोंशिवाय सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये हळदी समारंभाचा आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्रिशा शाहची ब्रायडल एन्ट्री पाहता येते. फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की या दोघांचे हे लग्न खूप शाही होते, ज्यासाठी अंबानी कुटुंब देखील प्रसिद्ध आहे.