सारा अली खानने सावत्र भाऊ जेह अली खानच्या वाढदिवसानिमित्त अतिशय गोंडस फोटोस केले शेअर, सावत्र भावंडांचे हे नाते…

बॉलिवूड इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री करीना कपूर ही तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान या दोन मुलांची आई आहे. गेल्या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी करिनाने तिच्या धाकट्या मुलाला जहांगीर (जेह) ला जन्म दिला आणि आज जेह पूर्ण वर्षाचा झाला आहे. या खास प्रसंगी केवळ सेलेब्सच नाही तर करीना आणि सैफचे चाहतेही त्यांच्या छोट्या नवाबला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच आता मोठी बहीण आणि अभिनेत्री सारा अली खानने जहांगीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी साराने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये साराचे तिच्या भावासोबतचे खास बॉन्डिंग दिसत आहे. सारा अली खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सैफ त्याच्या चार मुलांसोबत दिसत आहे. सारा आणि इब्राहिम त्यांचे दोन धाकटे भाऊ तैमूर आणि जेह यांच्यावर खूप प्रेम करतात हे या छायाचित्रांवरून स्पष्ट होते.

पहिल्या फोटोमध्ये सैफ त्याची चार मुले सारा, इब्राहिम, तैमूर आणि जेहसोबत दिसत आहे. यादरम्यान साराने जेहला आपल्या कडेवर घेतले आहे आणि इब्राहिमने तैमूरला आपल्या खांद्यावर बसवले आहे. काही छायाचित्रांमध्ये सारा, इब्राहिम आणि जेह एकत्र दिसत आहेत. काही चित्रांमध्ये सैफ, इब्राहिम, सारा लहान जेहसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

या सगळ्यामध्ये साराने स्वतःचा आणि जेहचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये सारा तिच्या धाकट्या भावाला खायला घालताना दिसत आहे. साराने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. अवघ्या 30 मिनिटांत या फोटोंना 4 लाख 67 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोंसोबत सारा अली खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅपी फर्स्ट बर्थडे बेबी.’

यासोबतच साराने अनेक हार्ट आणि केक इमोजीही टाकल्या आहेत. चाहतेही या फोटोंवर सतत कमेंट करत आहेत आणि हार्ट आणि फायरचे इमोजी शेअर करत आहेत. सारा व्यतिरिक्त आई करीना कपूरनेही जहांगीरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाने दोन फोटो शेअर केले आहेत. एका चित्रात जहांगीर आणि तैमूर खेळताना दिसत आहेत तर दुसऱ्या चित्रात छोटा जहांगीर त्याचे वडील सैफसोबत दिसत आहे.

त्याचबरोबर आत्या सबा आणि मावशी करिश्मा कपूर यांनीही जहांगीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जेहचे हे अतिशय गोंडस फोटोस आणि व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर चाहते जेह ला भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.