हृतिक रोशन प्रिय मित्र आणि प्रसिद्ध अभिनेत्याच्या लग्नात केला जोरदार डान्स, व्हिडीओ समोर येताच चाहते झाले थक्क..

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर शनिवारी विवाहबंधनात अडकले आहेत. खंडाळ्यातील एक रिसॉर्टमध्ये हे लग्न पार पडले, लग्नाला बॉलिवूडमधील अनेक अभिनेते-अभिनेत्री पोहोचले. आता फरहानच्या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हृतिक रोशनने फरहानच्या लग्नात ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सीन रिक्रिएट केला होता.

फरहान आणि शिबानीच्या लग्नात हृतिक रोशनही पोहोचला होता. आता हृतिक आणि फरहानच्या डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील सेनोरिटा गाण्यावर डान्स करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका चाहत्याने लिहिले की, इम्रान आणि अर्जुनने ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’मधील सेनोरिटा गाणे रिक्रिएट केले आहे.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ 2011 मध्ये रिलीज झाला होता. फरहान आणि हृतिक रोशन यांनी इम्रान आणि अर्जुनची भूमिका केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली. त्याचवेळी फरहानच्या लग्नाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये फरहान आणि शिबानी एकत्र डान्स करत आहेत. त्याचबरोबर हृतिकही काही काळ गाण्यावर डान्स करत आहे.

फरहान अख्तर आणि शिबानी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. खंडाळ्यात जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. रिया चक्रवर्ती, आशुतोष गोवारीकर, अमृता अरोरा, हृतिक रोशन आणि त्यांचे कुटुंबीयही लग्नाला पोहोचले.

Leave a Reply

Your email address will not be published.