राखी सावंतवर कोसळले मोठे दुःख, पतीपासून वेगळे होऊन….

अभिनेत्री राखी सावंतने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पतीपासून वेगळे झाल्याची घोषणा केली आहे. आता राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पापाराझींसमोर ढसाढसा रडताना दिसत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून राखीने रितेशवर आ’रोप करत रितेशने तिचा वापर केल्याचे सांगितले. सोबतच तिने असेही सांगितले की आता ती कोणाकडे जाणार नाही कारण तिच्याकडे देव आहे.

राखी म्हणाली, “मला कोणाच्याही आई-वडिलांनी पोलीस स्टेशन किंवा कोर्टरूममध्ये जावं असं वाटत नाही. रितेश, मी तुला दोष देणार नाही. मी कोणाकडे जाणार नाही कारण माझ्याकडे देव आहे. मी तुला देवाच्या हातात देते. त्याने माझा वापर केला. मी त्याचा वापर केला नाही. त्याने केला असता तर त्याने मला आता मुंबईत फ्लॅट दिला असता. तो माझ्या नावावर झाला असता.

त्याने मला कोणतीही सुरक्षा दिली नाही. राखी पुढे म्हणाली, “लग्नात कानातले आणि हार दिल्याने काही संपत्ती होत नाही. त्याने मला काहीही दिले नाही. आजही मी माझ्याच घरात राहते. आजही मी माझ्या घरातील मोलकरणीला पैसे आहे. मी सांभाळते. माझा संपूर्ण खर्च. जेव्हा मी रितेशसोबत बिग बॉसमध्ये गेले होते तेव्हा मला खूप आनंद झाला होता.

राखी म्हणते, “मला आधी कळले असते की बिग बॉस नंतर रितेश मला सोडून जाणार आहे, तर मी त्याला कधीच बोलावले नसते आणि स्वतःवर डागही आणला नसता. रितेश मला सोडून गेला कारण त्याच्या पत्नीसोबत काही कायदेशीर समस्या आहेत. त्याला मुलं आहेत. त्याची पत्नी कोर्टात गेली आहे.

रितेशने माझ्यावर आ’रोप केले आहेत की, तू मला बिग बॉसमध्ये घेऊन माझे आयुष्य खराब केले आहेस. माझे करोडोंचे नुकसान झाले आहे. माझ्या चारित्र्यावर कलंक लागला आहे. तू माझा वापर केलास.”

Leave a Reply

Your email address will not be published.