अर्जुन कपूरच्या कुशीत, मलायका अरोराने तिचा व्हॅलेंटाईन डे एक रोमँटिक फोटो शेअर करून साजरा केला आणि म्हणाली- माझे…

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने बॉलीवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांनी आपल्या जोडीदाराला गोंडस पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर रोमँ’टिक फोटो शेअर करत नेहा कक्करने लिहिले की, ‘रोहू आपल्या नेहाला खास वाटण्याची एकही संधी सोडत नाही. मी तुझ्यावर प्रेम करते रोहनप्रीत सिंग, सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.’ या व्हॅलेंटाइन पोस्टमध्ये हे कपल एकमेकांच्या डोळ्यात बुडलेले दिसत आहे.

23 व्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध अँकर-होस्ट मंदिरा बेदीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मंदिराने तिचा पती राज कौशलसोबतच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे, राज कौशलच्या मृ’त्यूनंतर मंदिराने त्यांची आठवण काढली आणि लिहिले – आज आमच्या लग्नाचा 23 वा वाढदिवस असता. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे.

जो दोघांनीही खास पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. या दोघांचे व्हॅलेंटाइनचे फोटो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. व्हॅलेंटाईनच्या या खास प्रसंगी एजाज खानने त्याची लेडी प्रेयसी पवित्रा पुनिया हिच्यासाठी खास कॅन्डल लाईट डिनरचे आयोजन केले होते, तर पवित्राने तिचे हृदय तिच्या खान साहेबांना सुपूर्द केले होते. लग्नानंतर मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत पहिला व्हॅलेंटाईन साजरा करत आहे.

या खास प्रसंगी मौनी रॉयने तिच्या प्रेमासाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करणार आहेत. बिझी शेड्युलमुळे हे कपल या व्हॅलेंटाईनपासून दूर जाईल असे चाहत्यांना वाटत होते, पण असे काही घडले नाही आणि दोघेही एअरपोर्टवर एकमेकांचा हात धरताना दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published.