रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ च मोशन पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आल आहे. दिल्लीत चित्रपटाच्या स्टारकास्टच्या उपस्थितीत अयान खान मुखर्जीने हा मोशन पोस्टर प्रदर्शित केला आणि या सोबतच चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. या कार्यक्रमादरम्यान तिन्ही कलाकारांनी अनेक खुलासे केले, पण जेव्हा रणबीरने आलियाला अस काही सांगितल की, अभिनेत्री लाजू लागते, तेव्हाची दृश्ये देखील चाहत्यांच्या हृदयाला भिडली.
रणबीरच्या हातात जसा माईक आला तेव्हा तो आलियाला विचारताना दिसला की, “तुझ्या आयुष्यात R फॅक्टर काय आहे? जिथे आपण जातो तिथे लोकं हाच प्रश्न विचारतात. आज या जगाला सांगचं” रणबीरचे हे बोलणे ऐकून आलिया भट्ट लाजते आणि पुढे खूप हुशारीने उत्तर देते की, R माझ्या आयुष्यातला नंबर 1 आहे.
यानंतर आलिया देखील रणबीरला सोडत नाही आणि तिने त्याला A मिनिंग काय आहे असं विचारल. यावर रणबीर उत्तर देत म्हंटला, “माझ्यासाठी A म्हणजे अमिताभ बच्चन, A म्हणजे अयान मुखर्जी यानंतर दोघंही अयान मुखर्जी यांना शोधू लागतात. पण अर्थातच रणबीरच्या आयुष्यात A म्हणजे आलिया भट्टलाच महत्वाच स्थान आहे. रणबीर आलियाला हा मस्तीचा गोड व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.