केवळ ‘या’ व्यक्तीमुळे विशाल निकम ठरला बिगबॉस मराठीचा विजेता, तर जय दुधानेच्या गळ्यात उपविजेत्यापदाची माळ

बहुचर्चित लोकप्रिय ठरलेल्या बिगबॉस मराठीला अखेर तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. विशाल निकम हा ‘बिगबॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. या महाअंतिम सोहळ्यात जय दुधाने आणि विशाल निकम यांच्यात अटी-तटीचा सामना बघायला मिळाला. मात्र, शेवटी प्रेक्षकांचा कौल विशालकडे झुकला आणि तो यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

बिगबॉस मराठीच्या अंतिम फेरीमध्ये जय, विशाल, विकास, उत्कर्ष आणि मीनल शहा हे पाच स्पर्धक टॉप पाच फायनलिस्ट होते. मात्र अंतिम सोहळा सुरु झाल्यानंतर काही वेळातच मीनल आणि उत्कर्ष यांना स्पर्धेतून निरोप घ्यावा लागला. त्यानंतर विकास पाटीलला देखील निरोप घ्यावा लागला आणि जय व विशाल यांच्यात अटी-तटीचा रंगतदार सामना बघायला मिळाला.

बिगबॉस मराठीच्या पहिल्या, दुसऱ्या पर्वासारखेच तिसरे पर्व देखील अत्यंत लोकप्रिय व बहुचर्चित ठरले. प्रेक्षकांच्या मताने विशाल निकम या पुरस्कारापर्यंत पोहचला. बिगबॉस मराठीचे तिसरे पर्व जिंकल्यानंतर विशालला बक्षीस स्वरूपात ‘बिगबॉस’ ची ट्रॉफी आणि 20 लाख रुपये धनादेश मिळाला.

दरम्यान, बिगबॉसच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या विशालला खरी ओळख ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत त्याने ज्योतिबाची भूमिका साकारली होती. त्याच बरोबर विशालने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे तसेच विशालने ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत देखील महत्वाची भूमिका साकारली.

Leave a Reply

Your email address will not be published.