बॉलिवूड मधील सुपर हॉट आणि बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे नेहमी आपल्या फोटोज आणि व्हिडिओज मुळे चर्चेत राहते. हल्लीच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या मोनोकिनी मध्ये पावसाची मजा घेताना दिसत होती. या व्हिडिओचे चित्रकरण तीचे पती सॅम बॉम्बे यांनी केले होते. आता पुनम ने आपल्या पतीसोबत केलेल्या प्रणयरम्य गाण्याच्या दृश्याबद्दल एक हृदयाची धडधड वाढणारा खुलासा केला आहे.
बाल्कनी मधील पावसातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांचे एक गाणे प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. माहितीनुसार, या गाण्याच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना एका कार्यक्रमात पूनम यांनी सांगितले की त्यांनी आपल्या पतीसोबत जे चित्रीकरण केले आहे. त्यामध्ये त्यांच्यासोबत असे काही झाले आहे जे करण्यासाठी त्या थरथरत होत्या. हे एका गाण्याचे चित्रीकरण होते, जे लवकरच प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे.
या गाण्याबद्दल बोलताना पुनम पांडे ने सांगितले की, ‘ ते एक परिपूर्ण आहेत, या गाण्यासाठी सॅमने मला 4 तासांपर्यंत माशांच्या टाकीमध्ये शार्क सोबत बसवून ठेवले. त्यांनी मला एवढ्या वेळेपर्यंत बसवून ठेवले की मी नंतर थरथरू लागले. ‘ या चित्रीकरणाबद्दल सॅमने सांगितले की, ‘ खूप मोठी माशांची टाकी आहे, लहान नाही आहे. म्हणून असे नका विचार करू की लहानशा माशांच्या टाकीत तीला टाकले होते. ‘
सॅम बॉम्बे ने याबद्दल सांगितले की, ‘ आम्ही आता एका संगीत व्हिडिओचे चित्रीकरण करत आहोत. गाण्याचे गायक व संगीतकार हे माझे मित्र आहेत जे आता लंडन मध्ये आहेत. त्यांनी दोन गाणे पाठवले आहेत आणि दोन्हीही खूप चांगले गाणे आहेत. एका गाण्यासाठी आम्हाला अनेक सहकाऱ्यांची व सहनर्तकांची गरज आहे. म्हणून आम्ही या गाण्याला थांबवले आहे. दुसरे गाणे ज्याचे आम्ही आता चित्रीकरण करत आहोत ते खूपच प्रणयरम्य गाणे आहे. म्हणून आम्ही समुद्र किनाऱ्यावर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आतापर्यंत 70% गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. ‘
या गप्पागोष्टी दरम्यान पूनम यांनी विचारल्या गेले की, सॅम काय एक चांगले दिग्दर्शक आहेत की चांगले पती आहेत ? यावर पूनम यांनी मजेदार उत्तर दिले आणि सॅमचे कौतुक केले. ती म्हणाली, ‘ जरी ते माझे पती नसते, मी म्हणते की ते त्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक आहेत, ज्यांच्यासोबत मी चित्रीकरण केले आहे. त्यांनी मला 10 पटीने जास्त सुंदर दाखवले आहे. ‘