लोकप्रिय दूरदर्शन विनोदी मालिका ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ मधील कलाकारांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. हे सर्व कलाकार एवढे लोकप्रिय झाले आहेत की चाहते त्यांना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी भूमिकेतील नावाने ओळखतात.
या मालिकेतील अशीच एक व्यक्तिरेखा आहे बबीता अय्यर, ज्यांना सर्वजण बबीता जी या नावाने बोलावतात. जी सोसायटी मधील सर्वात स्टायलिश महिला आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता वास्तविक आयुष्यात खूप बोल्ड आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का मुनमुन ने ही लोकप्रियता प्राप्त करण्यासाठी आधी आयुष्यात खूप कटू अनुभव घेतले आहेत.
तर सन 2008 मध्ये जेव्हा मुनमुन एवढी लोकप्रिय नव्हती, मात्र तिची खूप चर्चा चालू होती. कारण होते की चित्रपट अभिनेता अरमान कोहली सोबत असलेले तिचे नातेसंबंध आणि वाद-विवाद. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तिचा प्रियकर अरमान मलिक ने तिच्यासोबत मारपीट केली होती. मुनमुन आणि अरमान यांचे नातेसंबंध सुरू होताच काही दिवसात संपले होते. नंतर या ब्रेकअप चे कारण अरमान चा राग आणि आक्रमक स्वभाव हे सांगितले गेले.
झाले असे होते की व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अरमान ने मुनमुन सोबत मारपीट केली होती. यानंतर मुनमुन ने आपल्या सोबत झालेल्या या अपराधाची तक्रार पोलिसांत केली होती. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचले होते. ज्यामुळे अरमान ला आपल्या कृत्याबद्दल माफी मागावी लागली होती.
मुनमुन दत्ताने मागच्या काही वर्षांअगोदर #Metoo मध्ये आपला कडू अनुभव शेयर करताना सांगितले होते की, ‘ प्रत्येक महिलेला कधी ना कधी यौन शोषणाचा सामना करावाच लागतो आणि हे प्रत्येक वयात होते. लहानपणी मी शेजारी राहणाऱ्या एका काकांपासून घाबरत होती, कारण जेव्हा पण ते मला एकटे बघत होते ते मला घट्ट पकडत होते आणि धमकी देत होते की मी ही गोष्ट कोणाला सांगू नये लपवून ठेवावी.
यासोबतच तिने सांगितले होते की, ‘ वयाच्या 13 व्या वर्षी माझ्या शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनी माझ्या आंतरवस्त्रात हात टाकला होता. त्यावेळेस मला हे समजल नाही की मी हे माझ्या घरच्यांना कसे सांगू. माझ्या मनात तेव्हा पुरुषांबद्दल एक वेगळीच प्रतिमा छापली गेली होती. मला त्यांचा राग येत होता कारण मला वाटत होते की तेच अपराधी आहेत.