कधीच कोणाला नाही द्यावी आपल्या ‘ या ‘ पाच गोष्टींची माहिती, जाणून घ्या काय म्हणतात जया किशोरी..!

जया किशोरी या भारतातील चर्चेत राहणाऱ्या कथावाचिका आहेत. या आता प्रेरणा देणाऱ्या व्याख्याता देखील झाल्या आहेत. जया किशोरी या नेहमी आपल्या इंस्टाग्रामच्या खात्यावरून काही ना काही प्रेरक व्हिडिओज शेयर करत राहतात. सोशल मीडियावर जया किशोरी यांचे लाखो फॉलॉवर्स आहेत. त्यांनी आपल्या अध्यात्मिक कारकिर्दीची सुरुवात वयाच्या सातव्या वर्षापासून केली होती. जया किशोरी यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेयर करून त्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत ज्या व्यक्तीने कोणासोबतच शेयर करू नये.

1. आपली मोठी योजना कोणालाच सांगू नये : जया किशोरी म्हणतात की कधीही आपली मोठी योजना कोणालाच सांगितली नाही पाहिजे. मोठ्या योजनेचा अर्थ आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी जर काही मोठी योजना तयार केली असेल तर ते देखील कोणाला सांगू नये.

2. प्रेम जीवनाबद्दल सांगू नये : जया किशोरी यांच्यानुसार कधीही आपल्या प्रेम जीवनाबद्दल दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला सांगू नये. कारण असे केल्याने तुमचे नातेसंबंध तुटण्याची शक्यता वाटते. तुम्ही तुमचे प्रेम जीवन जेव्हढे गुपित ठेवाल तेवढे चांगले आहे.

3. कुटुंबातील गोष्टी कोणाला सांगू नये : प्रत्येकाच्या कुटुंबात काही ना काही अडचणी असतातच. मात्र याबद्दल दुसऱ्यांसोबत चर्चा नाही केली पाहिजे. कारण असे केल्याने तुमचे कौटुंबिक आयुष्य बिघडू शकते. असे असू शकते की समोरच्या ऐकणाऱ्याने तुम्हाला चुकीचा सल्ला द्यावा किंवा तुमच्यामागे तुमची थट्टा करत असेल. म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबातील अडचणी कोणासोबत शेयर करू नये.

4. तुमच्या पुढच्या चालीबद्दल कोणाला सांगू नये : कोणत्याही गोष्टीशी संबंधित तुमची पुढची चाल काय असेल याबद्दल फक्त तुम्हालाच माहित असेल तर ते चांगले राहील. कारण तुम्ही जेव्हा कोणाला काही सांगता तर ती गोष्ट कधी दुसऱ्या पासून तिसऱ्या व्यक्तीकडे आणि तिसऱ्या व्यक्तीपासून चौथ्या व्यक्तीपर्यंत पोहचेल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही.

5. आपल्या पगाराबद्दल कोणाला सांगू नये : तुम्ही किती कमवता याबद्दल कोणालाच काही सांगू नये. कारण तुमची कमाई ऐकून समोरचा व्यक्ती तुमची इर्षा करू शकतो. दुसऱ्यांना बघून आनंदी होणारे लोक या जगात खूप कमीच असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.