हात मिळवून तुम्ही कोणाचे पण जाणून घेऊ शकता चरित्र !!! असा आहे मार्ग..

हस्तरेषा विशेषज्ञांनुसार, मणिबंध रेषांपासून ते बोटांपर्यंतच्या भागाला भाग्य हात म्हणतात. व्यक्तीच्या हाताला बघून कोणत्याही व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगितले जाऊ शकते. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हस्तरेषेवर लिहिलेले पुस्तक किरो हस्तरेषा शास्त्रापासून विशेष माहिती ज्यामधे सांगितले गेले आहे की कोणत्याही व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी हाताची बनावट, तळहात, करपृष्ठ, नखं, बोटे, अंगठा इत्यादींच्या रेषांचे व चिन्हांचे अध्ययन केले जाते.

हस्त विशेषज्ञ म्हणतात की, हाताच्या तळव्याची त्वचा आणि हातावरील रेषा बघून माणसाच्या स्वभावाबद्दल जाणून घेता येऊ शकते. किरो या पुस्तकानुसार कुशल आणि अनुभवी व्यक्ती मात्र फक्त हाताला स्पर्श करूनच कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाशी परिचित होऊन जातात. हाताला स्पर्श केल्याने व्यक्तीबद्दल अनेक गोष्टींबद्दल जाणून घेता येऊ शकते. जसे की –

1. पुस्तकानुसार जर एखाद्या व्यक्तीचा हाताचा तळवा मांसल किंवा कठोर असेल, तर ती व्यक्ती सिद्धांतवादी असते.

2. जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचा तळवा छोटा, पातळ, मांसहीन आणि नरम असेल तर असा व्यक्ती चारित्र्यहीन मानला जातो.

3. जर हाताचा मध्यभाग चपटा आणि उंच असेल तर असा व्यक्ती अहंकारी असतो.

4. जर हाताच्या तळव्यातील मध्यभाग कमी असेल तर असा व्यक्ती स्वभावाने घाबरट आणि भेकड असतो.

5. ज्या व्यक्तीच्या हाताच्या तळवा कमी कठोर आणि मांसल असतो तर असा व्यक्ती कष्ट करणारा आणि भावनिक असतो.

6. ज्या व्यक्तीच्या हाताचा तळवा मांसल व साधारण कठोर असेल तर असा व्यक्ती सिद्धांतवादी व इमानदार असतो.

या व्यतिरिक्त आपल्या हातावर अन्य बऱ्याच रेषा असतात ज्यामुळे देखील आपल्या भाग्याबद्दल समजते. याबद्दल असे म्हणले जाते की जर जीवन रेषा पिवळी असेल आणि रुंद असेल तर जातकाचे आरोग्य चांगले नाही मानले जात.

Leave a Reply

Your email address will not be published.