स्वप्नशास्त्राच्यामते जर कधी स्वप्नात पैशांचे नुकसान होताना, आकाशातून पडताना, केस कापताना असे काही दिसले गेले तर समजून जा की ही स्वप्ने तुम्हाला तुमच्या भविष्यात येणाऱ्या अशुभ घटनांचे संकेत देत आहेत. या व्यतिरीक्त दात पडणे, नदीला पूर आल्याचे बघणे किंवा सूर्यास्त स्वप्नात बघणे अत्यंत वाईट मानले जाते.
जर तुम्ही स्वप्नात चांदणी पकडत आहात तर निश्चिंत रहा, कारण हा एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही देखील चांदणी सारखे लवकरच चमकणार आहात. हे स्वप्न तुम्हाला मान-सन्मान वाढण्याचे संकेत देत आहे.
स्वप्नात घोड्यावरून पडणे, बंद नाला बघणे, होडीमध्ये बसणे किंवा मांजरीला बघणे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की अशा गोष्टींचे स्वप्नात येणे हे तुमच्या भविष्यात येणाऱ्या अडचणींचे संकेत देतात. जर तुमच्या स्वप्नात जंगल किंवा घुबड दिसले तर समजून जा की तुम्हाला व्यवसायात व कारकिर्दीत मोठी हानी होणार आहे.
स्वप्नात कोकिळा दिसणे, चाकू मारणे, कातर चालवणे किंवा कोणाला चापट मारणे असे दिसणे हे चांगले संकेत नसतात. असे म्हणजे जाते की हे स्वप्न दांपत्य आयुष्यासाठी अत्यंत वाईट असतात.
वाईट स्वप्न दिसल्यास सकाळी उठताच भगवान शंकर यांची पूजा करावी. शंकर भगवान यांचा रुद्राभिषेक करावा. पूजा करताना मनात प्रार्थना करावी की देव तुमची रक्षा करो. या व्यतिरिक्त दुर्गा सप्तशतीचे वाचन करावे. असे वाईट स्वप्न बघितल्यानंतर जर तुमच्या मनात काही शंका असेल किंवा तुमचे मन चिंतेत असेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.