कालसर्प दोषापासुन मुक्ततेसाठी सर्वात चांगला दिवस आहे हा !! फक्त करावे लागेल हे काम…

देवी पार्वती यांची आई देवी धुमावती रुपाबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे हे रूप अत्यंत भयानक आहे. खरंतर, देवी पार्वती यांनी भुकेने व्याकूळ होऊन आपले पती भगवान शिव यांनाच गिळून टाकले होते म्हणून त्यांचे हे रूप विधवेचे रूप आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीच्या तिथीला धुमावती जयंती साजरी केली जाते. यावेळेस धुमावती जयंती 18 जूनला आहे. या दिवशी देवीची विधी-विधानाने पूजा केल्याने खूप लाभ मिळतो.

देवी धुमावती पापी लोकांना दंडित करण्यासाठी अवतरीत झाल्या होत्या. ऋषी दुर्वासा, भृगु, परशुराम यांची मूळ शक्ती देवी धूमावती याच आहेत. यांची पूजा केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्त होते. या व्यतिरिक्त अन्य प्रकारचे संकट देखील दूर होते.

इच्छेनुसार पूजा करण्याचे नियम
– कर्जापासून मुक्ततेसाठी धुमावती जयंतीच्या दिवशी निंबाच्या पालांनी आणि तुपाने हवन केले पाहिजे

– दरिद्रता दूर करण्यासाठी या दिवशी गुळ व उसाचे सेवन करावे.

– जुना आजार आणि एखादे मोठे संकट टाळण्यासाठी गोड चपाती आणि तुपाने हवन करावे.

– कालसर्प दोष आणि क्रूर ग्रहांचे दोष संपवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. यासाठी देवी समोर जटामांसी आणि काळया मिरच्यांची हवन करावे.

– दीर्घकाळ सौभाग्यासाठी रक्तचंदन घासून त्यामध्ये मध टाकून हवन करावे.

– कारागृह, न्यायालयाच्या प्रकरणात अडकलेल्या लोकांना यामधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही काळया मिरच्यांनी हवन करू शकता.

‘ या ‘ मंत्रांचा करावा जप
धुमावती जयंतीच्या दिवशी काही मंत्रांचा जप केल्याने देखील तुमच्या इच्छा पूर्ण होतात. यासाठी ॐ धूं धूं धूमावत्यै फट्, ॐ धूमावत्यै विद्महे संहारिण्यै धीमहि तन्नो धूमा प्रचोदयात, धूम्रा मतिव सतिव पूर्णात सा सायुग्मे, सौभाग्यदात्री सदैव करुणामयि: या धूं धूं धूमावती ठ: ठ: या मंत्रांचा जप करावा. या दरम्यान हे लक्षात ठेवावे की हे देवीचे उग्र रूप आहे त्यामुळे पूजा करताना अत्यंत काळजी घ्यावी. ही पूजा मार्गदर्शनाखालीच करावी, अन्यथा पूजा चुकल्यास तुम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.