मंगळवारच्या दिवशी खालील उपाय केल्यास बजरंगबली करतील तुमची संकटातून मुक्तता !! जाणून घ्या त्या उपायांबद्दल..

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. मंगळवार बद्दल बोलायचे झाले तर या दिवसाचे देव महाबली रामभक्त हनुमान हे आहेत. असे म्हणतात की बजरंगबलींच्या प्रार्थनेने तुमचे सर्व कष्ट दूर होतात. हनुमानजी यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक लोक मंगळवारी उपवास करतात. यांच्या पूजेमुळे मंगळ ग्रह देखील मजबूत होऊन आपला शुभ प्रभाव दाखवू लागतो. जाणून घ्या की मान्यतेनुसार मंगळवारच्या दिवशी कोणते विशेष उपाय करून आर्थिक, कौटुंबिक पासून ते सर्व प्रकारच्या संकटांपासून होईल सुटका..

मंगळवारच्या दिवशी स्वच्छ मनाने बजरंगबाणाचे वाचन केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. याचे वाचन एका जागेवर बसून अनुष्ठानपूर्वक 21 दिवसांपर्यंत केल्याने तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. हनुमानजी यांना शेंदूर प्रिय आहे म्हणून संकटांपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी हनुमानजी यांची शेंदूर लावून पूजा केली पाहिजे. असे केल्याने तुमची कारकिर्दीत प्रगती देखील होते.

हनुमानजी यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवाच्या दिवशी पानाचा विडा जर नियमित पणे अर्पण केल्या गेला तर रोजगाराचे मार्ग मोकळे होतात. यामुळे नोकरीत पदोन्नती होण्याची देखील शक्यता वाढते. मंगळवारच्या दिवशी सायंकाळी हनुमानजी यांना केवड्याच्या किंवा गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण केल्याने देखील हनुमानजी यांची विशेष कृपा राहते. या दिवशी हनुमानजी यांच्या प्रतिमेसमोर बसून राम नामाचा 108 वेळा जप करणे देखील फलदायक मानले जाते. मंगळवारच्या दिवशी हनुमानजीं समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसेचे वाचन करावे. असे केल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात अशी मान्यता आहे.

मंगळवारच्या दिवशी मंदिरात जाऊन श्रीराम, देवी सीता व हनुमानजी यांचे दर्शन करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की असे केल्याने बजरंगबली तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी कष्टापासून मुक्ततेसाठी राम रक्षा स्त्रोत्राचे वाचन केले पाहिजे. आयुष्यात सुख समृद्धी राहो यासाठी मंगळवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत फलदायक मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी गायीला चपाती खाऊ घातल्याने नोकरीत पदोन्नती मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published.