ज्योतिषात गुरू ग्रह आणि त्यांची चाल यास खूप महत्त्वाचे मानले जाते. गुरूचा संबंध व्यक्तीच्या आर्थिक स्थितीशी, ज्ञान व बुद्धिमत्तेशी असतो. 12 जून 2021 म्हणजेच आजपासून गुरूची वक्र स्थिती सुरू होणार आहे. ते कुंभाच्या राशीमध्ये वक्री चालीने प्रवेश करतील आणि सप्टेंबरच्या महिन्यापर्यंत राहील. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर देखील पडेल मात्र 5 राशी अश्या आहेत, त्या लोकांना गुरूच्या वक्री चालीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया की गुरूची वक्री चाल कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव टाकेल.
मेष : गुरू या राशीमध्ये 11 व्या भावात राहतील. याला लाभाचे भाव म्हणले जाते, इथे गुरूचे वक्री होणे तुमचे आर्थिक नुकसान करू शकते. यावेळेस गुंतवणूक करताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सोबतच यादरम्यान ना कोणाकडून उधार घेतले पाहिजे ना कोणाला उधार दिले पाहिजे.
उपाय – चांगल्या परिणामांसाठी या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.
मिथुन : वक्री गुरू या राशीमध्ये 9 व्या भावात राहतील. हा धर्म, अध्यात्म व भाग्याचा भाव असतो. खूप कष्ट केल्यानंतरच फळ मिळेल. याव्यतिरिक्त वडिलांसोबत बोलताना काळजी घ्यावी, नाहीतरी वाद-विवादाची परिस्थिती उत्पन्न होऊ शकते.
उपाय – वडील, वयोवृद्ध आणि गुरुजनांचा आदर करावा.
सिंह : या राशीच्या 7 व्या भावात वक्री गुरू राहतील, जे की दांपत्य जीवनात अडचणींचे कारण बनू शकते. गुरूच्या उलट्या चाली दरम्यान जोडीदारासोबत तुमचे वाद-विवाद होऊ शकतात. त्यामुळे तुमचे म्हणणे व तुमच्या भावना विचार करूनच आपल्या जोडीदारासमोर व्यक्त करावे.
उपाय – गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करावे.
धनु : धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू हाच आहे, तर यांची उलटी चाल या राशीच्या लोकांवर वाईट प्रभाव टाकू शकते. या दरम्यान धनु राशीच्या लोकांना स्पष्टपणे बोलल्यास अडचण निर्माण होऊ शकते. सोबतच धाडस थोडेसे कमी राहील. लहान भावंडांसोबत वाद-विवादाची शक्यता आहे.
उपाय – नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी केळ्याच्या झाडाची पूजा करावी.
मीन : या राशीचे लोक शुभ कार्यावर जास्त खर्च करू शकतात. या लोकांचे होत आलेले काम बिघडू शकते, घरात भांडणे होऊ शकतात. प्रवासाचे योग बनतील.
उपाय – ध्यान व धर्म करावा ज्यामुळे तणाव कमी होईल.