मनोज बाजपेयी यांच्या पत्नीचे जबरदस्तीने बदलवले गेले होते नाव ?? स्वतः माध्यमांसमोर त्यांनी केला खुलासा..

बॉलिवूडचे सुपरस्टार मनोज बाजपेयी एक असे अभिनेता आहेत जे बिहारच्या चंपारण गल्लीतून निघून बॉलिवूडमध्ये आपले नाव कमवले. आपल्या दमदार अभिनयामुळे मनोज बाजपेयी आज बॉलिवूड मधील टॉप अभिनेत्यांच्या यादीमध्ये सामील आहेत. मनोज बाजपेयी आपल्या व्यवसायिक आयुष्याबरोबरच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल देखील चर्चेत राहतात. त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ते शबाना चे पती आहेत आणि मुलगी Ava चे वडील आहेत. आज आम्ही तुम्हाला मनोज बाजपेयी यांच्या पत्नी शबाना म्हणजेच चित्रपट जगतातील नेहा बद्दल एक विशेष गोष्ट सांगणार आहोत.

खरंतर, शबाना ने नेहा या नावाने बॉलिवूडमध्ये बॉबी देओल सोबत चित्रपट ‘ करीब ‘ पासून पदार्पण केले होते. यानंतर त्या अजय देवगण सोबत ‘ होगी प्यार की जीत ‘ आणि हृतिक रोशन सोबत ‘ फिजा ‘ सारख्या चित्रपटात दिसल्या. गुगल केल्यानंतर आज देखील त्या नेहा नावाने सापडतात. आपले नाव बदलण्याचा निर्णय शबानाचा नव्हता तर त्यांना हे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. याबद्दल स्वतः शबाना यांनी खुलासा केला होता.

याबद्दल बोलताना एका मुलाखतीत शबाना ने म्हणले होते की, ‘ मी कधीही नेहा नव्हते. मी नेहमी शबानाच होते. नाव बदलवण्यासाठी दबाव दिल्या गेला आणि मी यासाठी तयार नव्हते. माझ्या पालकांनी गर्वाने माझे नाव शबाना ठेवले होते. हे बदलण्याची काही गरज नव्हती मात्र कोणीच माझे ऐकले नाही. जेव्हा मी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, तेव्हा मी खूप समजूतदार होते. मला आधी प्रत्येक गोष्टीबद्दल थोडी भीती वाटत होती मात्र आता मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे समजून घेते. ‘

मात्र असे नाही आहे की शबाना ने आपल्या खऱ्या नावाने कधी काम नाही केले. संजय गुप्ताचा चित्रपट ‘ अलिबाग ‘ साठी शबाना ने आपले खरे नावच वापरले. याबद्दल अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘ हेच कारण होते की संजय आणि अलिबागची संपूर्ण टीम सोबत काम करणे हे माझ्या आयुष्यातील खूप चांगला अनुभव राहिला. मी संजयला म्हणले की मला माझ्या खऱ्या नावाने काम करायचे आहे आणि ते यासाठी तयार होते. मी आपली ओळख विसरले होते आणि आता मला ती पुन्हा मिळाली होती. ‘

जेव्हा मनोज बाजपेयी यांचा संघर्षाचा काळ चालू होता त्यादरम्यान त्यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न दिल्ली मधील एका मुलीसोबत लाऊन दिले, मात्र दोघांचे हे लग्न फारकाळ टिकू शकले नाही. बातम्यांनुसार, लग्नाच्या दोन महिन्यानंतरच दोघे वेगळे झाले. पहिले लग्न मोडल्यानंतर मनोज बाजपेयी यांच्या आयुष्यात बॉलिवूड अभिनेत्री नेहा म्हणजेच शबाना यांचे आगमग झाले. मनोज बाजपेयी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर शबानाने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.