‘ दिल ‘ चित्रपटाच्या चित्रीकरणादम्यान आमिर खान यांनी काय केले असे ?? की हॉकी घेऊन त्यांच्या मागे पळाल्या होत्या माधुरी !

सन 1990 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ दिल ‘ या चित्रपटाने लोकांचे खूप मन जिंकले. या चित्रपटातील आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांची जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. आज देखील हा चित्रपट व या चित्रपटातील गाणे आठवणीत आहेत. हा चित्रपट तर लोकांना खूप आवडला होता मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत ज्याचा संबंध चित्रपटाच्या चित्रीकरणाशी आहे आणि ज्यामुळे माधुरी दीक्षित चा राग खूप अनावर झाला होता.

माधुरी दीक्षित आणि आमिर खान ने 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘ दिल ‘ व्यतिरिक्त आणखी 2 चित्रपटात सोबत काम केले आहे ज्यामध्ये ‘ दिवाना मुझ सा नहीं ‘ आणि ‘ बॉम्बे टॉकीज ‘ देखील सामील आहे. यांचा चित्रपट ‘ दिल ‘ हा बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला मात्र ‘ दिवाना मुझ सा नहीं ‘ या चित्रपटाने पडद्यावर सरासरी प्रदर्शन केले. या चित्रपटात दोघांव्यतिरिक्त खुशबू, सत्येंद्र कपूर, बीना बॅनर्जी, दिनेश हिंगु सारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

आमिर ने याबद्दल खुलासा एका चॅट शो दरम्यान केला की कसा त्यांनी हात बघण्याच्या निमित्ताने माधुरी सोबत विनोद केला होता. सेटवर झालेल्या या किस्स्याबद्दल सांगताना आमिर खान म्हणाले की, ” माधुरी माझ्यावर खूप रागावली होती कारण सेटवर मी त्यांचा हात बघण्याचे नाटक केले होते. ” आमिर खान हे माधुरीला म्हणाले होते की तुम्ही खूप भोळ्या आहात, भावनिक आहात आणि लोक तुम्हाला फसवतात जसे की मी तुम्हाला आता फसवत आहे आणि असे म्हणून आमिर ने अभिनेत्रीच्या हातावर थुंकले.

आमिरच्या या विनोदावर माधुरी यांना खूप राग आला आणि त्यांनी हॉकी स्टिक घेऊन आमिर ला सगळीकडून पळवले. माधुरीने देखील ट्विटर वरून आपल्या चाहत्यांशी गप्पागोष्टी करताना या गोष्टीवर मोहर लावली की ‘ दिल ‘ चित्रपटाच्या सेटवर त्या आमिर च्या विनोदाने खूप नाराज झाल्या होत्या आणि आमिर च्या मध्ये हॉकी स्टिक घेऊन पळाल्या होत्या.

सन 2016 मध्ये जेव्हा एका चाहत्याने ट्विटरवर माधुरीला हे विचारले होते की आजपर्यंत तुम्ही सर्वात जास्त खोड्या कधी केल्या आहेत तर माधुरीने उत्तर देताना सांगितले की, ” दिल चित्रपटाच्या चित्रीकरणादम्यान मी आमिर च्या मागे हॉकी स्टिक घेऊन पळाली होती, कारण त्यांनी माझ्यावर विनोद केला होता. हीच सर्वात जास्त खोडी होती जी मी आतापर्यंत केली आहे. “

Leave a Reply

Your email address will not be published.