तुमच्या मनात देखील आहेत अपूर्ण इच्छा !!! तर दर मंगळवारी करा हे विशेष उपाय, हनुमान जी करतील तुमच्या इच्छा पूर्ण

मंगळवार चा दिवस हा संकटमोचन भगवान हनुमान यांचा असतो. बजरंगबली यांची कृपा मिळवण्यासाठी अनेक लोक प्रत्येक मंगळवारी उपवास करतात मात्र ज्येष्ठ महिन्यातील मंगळवारचे विशेष महत्त्व असते. आज ज्येष्ठ महिन्यातील दुसरा मोठा मंगळवार आहे. हिंदू धर्मात याला मोठा मंगळवार म्हणले जाते. आज भगवान हनुमान यांची विधीवत पूजा केल्यास आणि काही उपाय केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.

हनुमानजी यांना प्रसन्न करण्यासाठी मोठ्या मंगळवारी करावे हे खालील उपाय..

1. मोठ्या मंगळवारी हनुमानजी यांचे दर्शन घेतल्यानंतर प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचे दर्शन नक्की घ्यावे. असे केल्याने रामभक्त हनुमान तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

2. मोठ्या मंगळवारी बजरंग बाणाचे वाचन करावे. यामुळे आत्मविश्वासात आणि साहसात वृद्धी होईल तसेच तुमचे विरोधी परास्त होऊन जातील.

3. हनुमानजी यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लाल चंदन किंवा चमेलीच्या तेलाने मिश्रित केलेले शेंदूर लावावे. त्यांना केवड्याची माळा किंवा इत्र अर्पण करावे.

4. या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात नारळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान भक्तांची इच्छा पूर्ण करतात.

5. मोठ्या मंगळवारी हनुमानजींच्या सोबतच पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करावी.

Leave a Reply

Your email address will not be published.