हिंदू धर्मात वास्तूशास्त्राचे वेगळे एक महत्त्व असते, अशामध्ये प्रत्येक शुभकार्य करण्याआधी वास्तूदोष नक्कीच बघितला जातो. अशाचप्रकारे हिंदू धर्मात अलंकाराचे देखील विशेष महत्त्व असते. आपण असे पण म्हणून शकतो की अलंकार घालणे ही हिंदू धर्मातील एक परंपरा देखील आहे. लग्न असो किंवा दुसरे काही शुभकार्य अलंकार घालण्याचे आपलेच एक विशेष महत्त्व असते. गुरुजनांनुसार, कमरेच्या खाली सोन्याचे अलंकार नाही घातले पाहिजे. पण का ? जाणून घेऊया याचे कारण..
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू यांना सोन अत्यंत प्रिय आहे, कारण सोन हे देवी लक्ष्मी यांचे स्वरूप असते. म्हणून सोन्याला शरीराच्या खालच्या भागात घालू नये. कारण पायात पैंजण आणि अंगठी घालणे भगवान विष्णूंसमवेत सर्व देवी-देवतांचा अपमान होतो.
वैज्ञानिक कारण
असे मानले जाते की दागिने म्हणजेच अलंकार शरीरात ऊर्जा उत्पन्न करतात. तेच चांदी शरीराला शीतलता प्राप्त करते. अशा परिस्थितीत कमरेच्या वर सोन्याचे आणि कमरेच्या खाली चांदीचे अलंकार घातल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते, ज्यामुळे अनेक रोगांपासून सुटका मिळते. पूर्ण शरीरात सोन्याचे अलंकार घातल्याने शरीरात समान ऊर्जेचा प्रवाह होतो. यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते आणि अनेक रोग होऊ शकतात.
स्त्रियांना जर पायात हाडांच्या दुखण्याची समस्या असेल तर, त्या चांदीचे पैंजण घालू शकतात. कारण, पैंजण पायाला रगडून हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याला आराम देते.
ज्योतिषानुसार, पैंजण घालण्याची जी जागा असते तिथे केतूचे स्थान असते. जर केतूमध्ये शीतलता नसेल तर नेहमी तुमच्या मनात नकारात्मक गोष्टीचं येतील. म्हणून सहनशक्ती वाढवण्यासाठी चांदीचे पैंजण घालणे खूप महत्त्वाचे आहे.